शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

क-हाडला मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 14:40 IST

दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले.

ठळक मुद्देउकाड्यात दिलासा : वाऱ्याने झाड मोडून पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान

क-हाड : गत महिन्यापासून उकाड्याने हैराण केलेल्या नागरिकांना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिलासा मिळाला. शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यावेळी जोरदार वारा सुटल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांसह नागरिकांचीही त्रेधा उडाली.

गत दोन महिन्यांपासून अगोदरच लॉकडाऊन व कोरोनामुळे सर्वजण घरात बसून होते. शासनाने लॉकडाऊनमुळे शिथिलता दिल्याने लोक घराबाहेर पडू लागले आहेत. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. घरातही उकाड्याने हैराण होऊन जात होते. अशात रविवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते.

उकाडाही प्रचंड जाणवत होता. त्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. रविवारीही सकाळपासून पावसाची चिन्हे होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक वारे वाहू लागले आणि त्यापाठोपाठ पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यानजीक व्यवसाय करणाºया अनेक किरकोळ विक्रेत्यांचीही त्रेधा उडाली.

दरम्यान, क-हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे जोरदार पाºयामुळे पिंपळाचे झाड मोडून ट्रॅक्टरवर पडल्याने दोन ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तसेच परिसरात काही घरांवरील पत्रेही उडून गेले.

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर