शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भेटीमागे केवळ भावना, दुसरा कसलाही रंग नाही! : बंडातात्या कऱ्हाडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:52 IST

Pandharpur Wari satara : वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यामुळेच संभाजी भिडे माझ्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या भावना आणि सहानभूती व्यक्त केली. ती भावना आम्ही स्वीकारली असून, यापेक्षा वेगळा कसलाही रंग या भेटीला नाही, असे मत बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभेटीमागे केवळ भावना, दुसरा कसलाही रंग नाही! : बंडातात्या कऱ्हाडकर स्थानबद्ध कऱ्हाडकरांची भिडेंनी घेतली भेट

कऱ्हाड : वारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यामुळेच संभाजी भिडे माझ्या भेटीला आले होते. त्यांनी त्यांच्या भावना आणि सहानभूती व्यक्त केली. ती भावना आम्ही स्वीकारली असून, यापेक्षा वेगळा कसलाही रंग या भेटीला नाही, असे मत बंडातात्या कऱ्हाडकर यांनी व्यक्त केले.कऱ्हाडातील निषेध मोर्चानंतर सोमवारी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी करवडी येथे स्थानबद्ध असलेल्या बंडातात्या कऱ्हाडकर यांची भेट घेतली. दोघांनी काहीवेळ चर्चा केली. यावेळी बंडातात्यांनी भिडे यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर अल्पकाळ दोघांनीही मनोगत व्यक्त केल्यानंतर संभाजी भिडे यांच्यासह त्यांचे अनुयायी निघून गेले. या भेटीनंतर बंडातात्या कऱ्हाडकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.बंडातात्या कऱ्हाडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढले. मला करवडीत आणून २० जुलैपर्यंत स्थानबद्ध केले आहे. प्रशासनाने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढल्यानंतर त्याबद्दल सहानुभूती वाटणारे अनेकजण येथे येऊन भेटत आहेत. त्याच पद्धतीने हिंदुत्वावर काम करणारे आणि आक्रमक असणारे संभाजी भिडे गुरुजी येथे मला येऊन भेटले. ते केवळ औपचारिक भेटीसाठी आले होते.

काही लोकांच्या मनात शंका येण्याची शक्यता आहे की, यांची ही भेट ठरलेलीच होती. एकमेकांच्या विचारानेच आले आहेत. मात्र, असे काहीही नाही. केवळ ही भेट औपचारिक होती. या भेटीवेळी गुरुजींनी शिदोरी म्हणून संदेश दिला. त्यामुळे यापेक्षा वेगळे काहीच नाही. वारकरी सांप्रदायाचे मूळ हिंदूच आहे. तसेच हा सांप्रदाय सर्वधर्म समभावाचाही आहे. त्यामुळे एका हिंदू संघटनेला वारकऱ्यांवर झालेला अन्याय सहन न झाल्यानेच शिवप्रतिष्ठानने त्यांची भावना, सहानुभूती व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPandharpur Wariपंढरपूर वारीSatara areaसातारा परिसर