शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

जूनमध्येच नवजा, महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 15:17 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली असलीतरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर पावसाची उघडीप असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देजूनमध्येच नवजा, महाबळेश्वरचा पाऊस एक हजारीकोयना धरणातील पाण्याची आवक मंदावली

सातारा : जिल्ह्यात पावसाने दडी मारली असलीतरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर पावसाची उघडीप असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वी पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच पूर्व भागातही काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला. या पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला. कोयनासारख्या धरणात अवघ्या पाच दिवसांत १० टीएमसीवर पाणीसाठा वाढला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामालाही सुरूवात केलेली. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा ५ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २२ तर यावर्षी आतापर्यंत १०८६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत २८ तर जूनपासून १२४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.४७ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. तर २४३१ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही होत आहे. पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणीची कामे रखडली आहेत.

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर