शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

भक्तिगीतातून संतपरंपरेचा सुरेल प्रवास..

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

वेण्णाई भक्तिमंचचा कार्यक्रम : ज्योत्स्नाभाभींना भावपूर्ण श्रद्धांजली

सातारा : महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात. संत परंपरा काय आहे. संतांनी काय आदर्श घालून दिले, याचे यथार्थ दर्शन सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी घडविले. भक्तिगीत, भावगीतांतून त्यांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास समोर आणला. सुमारे तीन तास सुरू असणारा हा कार्यक्रम सातारच्या महिलांना भावून गेला. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या ज्योत्स्नाभाभी दर्डा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा येथील शाहू कला मंदिरमध्ये ‘आठवण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर माने, सिद्धी पवार, जयश्री शिंदे, स्वाती ओक यांच्या उपस्थितीत झाले. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांची प्राणज्योत दोन वर्षांपूर्वी २३ मार्चला मालवली. त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सखी मंचने ‘आठवण’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ ही वंदना झाली. त्यानंतर सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास घडविला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला संस्कार दिले आहेत. महाराष्ट्रात विविध सांप्रदाय असले तरी वारकरी सांप्रदाय हा महत्त्वपूर्ण आहे. दरवर्षी लाखो भाविक आळंदी-पंढरपूरची वारी करतात. तसेच दर महिन्यालाही पंढरीच्या ओढीने जाणारे हजारो भाविक आहेत, असे सांगून त्यांनी ‘खेळ मांडियेला वाळवंटी दाटी, नाचती वैष्णव भाईरे...’ हे भक्तिगीत सादर केले. त्यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ हे भक्तिगीत सादर केले.‘शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान,’ हे भक्तिगीत सादर झाले. त्यानंतर ‘संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत’, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,’ ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे पुण्याची गणना कोण करी,’ दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,’ ‘काटा रुते कुणाला,’ ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा,’ तसेच ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ यासारखी भावगीतेही या कार्यक्रमात सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन सचिन सावंत यांनी केले. किरण भोसले, किशोर माने, किरण सावंत, संजय वर्णेकर यांनी गायन केले. हार्मोनियम किरण भोसले, सिंथेसायझर सोमनाथ गोरे, तबला हरी चव्हाण, ढोलकी वादन तुषार पवार, तालवाद्य अशोक पवार यांनी केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सखींनी भाभीजींच्या प्रतिमेला फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)सखी मंचला १३ वर्षे पूर्ण...ज्योत्स्नाभाभींच्या संकल्पनेतून साकारलेले ‘सखी मंच’ हे महिलांचे हक्काचं व्यासपीठ, आज त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचे असणारे ‘सखी मंच’ ज्योत्स्नाभाभींच्या अथक परिश्रमांचे, चिकाटीचे फळ आहे. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या अंकुराचे आज महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सखी मंचने आपल्या यशस्वी कारकिर्दीची तेरा वर्षे पूर्ण केली आहेत.