शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव

By नितीन काळेल | Updated: November 23, 2023 19:02 IST

सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा डंका

सातारा : महाआवास अभियानात २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पाटण तालुक्यातील जिंती आणि साताऱ्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा डंका पुन्हा एकदा वाजला आहे.शासनाच्या वतीने महाआवास अभियान राबविण्यात येते. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव केला जातो. २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सातारा जिल्ह्याने दुहेरी यश मिळविले आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत पाटण तालुक्यातील जिंती गावाने प्रथम क्रमांक मिळविला. या ग्रामपंचायतीने ७५ गुण प्राप्त केले आहेत. तर या आवास योजनेतच राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुलात सातारा तालुक्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीने तृतिय क्रमांक प्राप्त केला.मुंबईतील कार्यक्रमात जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, कोल्हापूरच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, विस्तार अधिकारी जयवंत ढाणे यांच्यासह जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, महाआवास अभियानातील या यशाचे तसेच जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी काैतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत