शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

फलटणमध्ये अतिक्रमणावर जेसीबीचा फावडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST

फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे ...

फलटण : फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करेसो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी मोठा जिना टाकला होता. या प्रकाराने नागरिकांमध्ये आणि त्या परिसरातील दुकानदारांमध्ये अतिक्रमणाबद्दल संतप्त भावना व्यक्त होत असताना सोमवारी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्या आदेशानुसार जेसीबीच्या सहाय्याने तो भला मोठा जिना तोडण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

फलटण शहरात गजानन चौकानजीक एका कापड विक्रेत्याने भलेमोठे दुकान पहिल्या मजल्यावर टाकले असून, त्या दुकानात जाण्यासाठी आतून जिना असतानाही आपले कोणी काही करू शकत नाही, या भावनेतून त्याने बाहेरून भला मोठा जिना काढून तो रस्त्यावर आणून टाकला होता. या भल्यामोठ्या जिन्यामुळे खालील गाळेधारक वैतागले होते. या जिन्यामुळे त्यांना आत येणे जाणे ही अवघड होत होते. फलटण शहरात वर्षापूर्वी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहीम राबवून वर्षानुवर्षे असणारी शहरातील अतिक्रमणे जमीनदोस्त केली होती.

क्रांतीसिंह नाना पाटील चौक तर अक्षरश: त्यांनी अतिक्रमणमुक्त करून या चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला आहे. आणखी काही अतिक्रमणे काढण्याची बाकी असताना कोरोनाचे कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मोहीम मध्येच थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मोठ्या धनदांडग्यांची अतिक्रमणे काढायची राहून गेल्याने ज्यांचे अतिक्रमण निघाले ते संतप्त झाले होते. मध्यंतरीच्या काळात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने केली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी कोरोना संपताच अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून गजानन चौक नारळी बागेमध्ये एका जुन्या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर मोडतोड करून एका कापड दुकानदाराने कपड्याचे मोठे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आतून जिना असतानाही त्या व्यापाराने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाजूस मोडतोड करून भलामोठा जिना रस्त्यापर्यंत आणून ठेवला होता. हा जिना काढताना त्याने कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. या जिन्यामुळे त्या कॉम्प्लेक्समध्ये खाली व्यापार करणाऱ्या दुकानदारांनाही येता जाता अडचण येत होती.

चौकट..

मुख्याधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर कौतुक..

नागरिकांमधून जिन्याच्या अतिक्रमणाचाबद्दल संतप्त भावना उमटत होत्या. नगरपालिका कारवाई करणार का नाही, अशा प्रतिक्रिया उमटत असताना मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सोमवारी नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या सोबतीला जेसीबी पाठवून देऊन तो जिनाच जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून टाकला आहे. या धाडसी कारवाईबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, शहरातील इतरही अतिक्रमणे काढण्याची मागणी वाढू लागली आहे

कोट...

फलटण शहरात यापुढे कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित दुकानदाराने कोणतीही परवानगी न घेता जिना उभारला होता तो काढून टाकण्यात आला आहे.

- प्रसाद काटकर, मुख्याधिकारी

०५फलटण

दुकानदाराने रस्त्याच्या कडेला टाकलेला जिना तर दुसऱ्या छायाचित्रात हा जिना जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.