शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव; सातारा जिल्ह्यात महामार्गावर ठिकठिकाणी स्वागत 

By दीपक देशमुख | Updated: September 10, 2023 16:14 IST

राष्ट्रवादीत बंड करून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात आले.

सातारा: राष्ट्रवादीत बंड करून महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यांचे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी झुंबड उडाली. कुठे फटाक्यांची आतषबाजी कुठे जोरदार घोषणा देण्यात आल्या. उंब्रजमध्ये तर जेसीबीतून अजित पवार यांच्यावर फुलांचा वर्षावर करण्यात आला. 

कोल्हापूर येथील नियोजित कार्यक्रमासाठी अजित पवार जात असले तरी जिल्हयात ठिकठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून सत्कार स्वीकारणार होते.  त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमानुसार नियोजित ठिकाणी कार्यकर्ते प्रतिक्षा करत होते. शिरवळ, खंडाळा, वेळे, जोशी विहीर, भुईंज, पाचवड, वाढे फाटा, बाँबे रेस्टॉरंट, नागठाणे आदी ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी  कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. महामार्गावर ठिकठिकाणी अजित पवार ताफा थांबवून स्वागत कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारत होते. वाढे फाटा येथे किरण साबळे पाटील तसेच कार्यकर्त्यांनी पवार यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. 

यानंतर बाँबे रेस्टॉरंट येथे ताफा आल्यानंतर अमित कदम, जयवंत घोरपडे, चंद्रकांत जाधव, श्रीमंत झांजूर्णे, सचिन साळुंखे, राजुकाका भोसले, शिवाजीराव महाडिक, अरुण माने, राजाभाऊ जगदाळे, संजय पिसाळ, नानासाहेब भिलारे, अजय कदम, सिद्धेश्वर पुस्तके, शिक्षक संघटना, मराठा बिझनेस फोरमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते माेठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यानंतर ताफा नागठाणे, कऱ्हाडच्या दिशेने रवाना झाला.

टॅग्स :satara-acसाताराAjit Pawarअजित पवार