शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

जेसीबीने रॅम्प फोडून अडकलेल्या म्हशी बाहेर

By admin | Updated: November 7, 2015 23:40 IST

महाबळेश्वरातील सर्व्हिस सेंटरमध्ये थरार

महाबळेश्वर : महाबळेश्वर-पाचगणी या मुख्य रस्त्यावरील वाहने धुण्याच्या सर्व्हिस सेंटरमधील रॅम्पमध्ये अडकलेल्या २ म्हशींना वाचविण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना यश आले.लिंगमाळा येथे जांभळे यांचे सर्व्हिसिंग सेंटर असून, येथे ३ फूट रुंद व ५ फूट खोलीच्या दोन रॅम्पमध्ये दोन म्हशी रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने अडकल्या. या म्हशी रात्री सातच्या दरम्यान पडल्या असल्याचा अंदाज आहे, रात्री नऊच्या दरम्यान येथे असणाऱ्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी त्वरित महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना ही माहिती दिली. दोन तासांच्या वर ट्रेकर्सचे जवान म्हशी काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. ज्या रॅम्पमध्ये या म्हशी अडकल्या होत्या, तो रॅम्प तोडण्यास रात्रीच्या काळोखात सुरुवात झाली. मात्र, दोन-तीन तास प्रयत्न करूनही म्हस निघत नसल्याचे लक्षात आल्याने महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मदतीने रात्री बाराच्या दरम्यान जेसीबी मागविण्यात आला. या जेसीबीच्या साह्याने अडकलेल्या दोन म्हशी बाहेर काढण्यात यश आले. कडाक्याच्या थंडीत रात्री जर या दोन अडकलेल्या म्हशी काढल्या नसत्या तर दोन मुक्या प्राण्यांचे प्राण वाचले नसते. मात्र ट्रेकर्सच्या जवानांना स्थानिकांच्या मदतीने दोन मुक्या प्राण्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. या मदतकार्यात विशाल तोष्णीवाल, ट्रेकर्सचे नीलेश बावळेकर, सनी बावळेकर, सुनील भाटिया, अक्षय व अमित माने, प्रथमेश जांभळे, संदीप जांभळे, जयवंत जांभळे, शंकर बावळेकर, ओमकार नाविलकर व जेसीबी चालक शिंदे, शिवाजी खंडझोडे हे आघाडीवर होते. (प्रतिनिधी)