शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

जयंत पाटील, तुम्ही लवकरच सभागृहात असाल; पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 15:18 IST

मी खोकी कोठून आणू : जयंत पाटील

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव आम्हा सर्वांच्या जिव्हारी लागला आहे; पण जयंतराव तुम्हाला लवकरच सभागृहात आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला प्रतिसाद दिला.कऱ्हाड येथे माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व विलासराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून चव्हाण बोलत होते.यावेळी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार संग्राम थोपटे, श्रीमंत पाटील, काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून चालत नाही, तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मी मुख्यमंत्री असताना राज्य बँकेबाबत धाडसी निर्णय घेतला. म्हणूनच ती बँक आज वाचली आहे.मी खोकी कोठून आणू : जयंत पाटीलजयंत पाटील म्हणाले, खरंतर आजचा हा कार्यक्रम ठरवताना ॲड. उदयसिंह पाटील यांनी पहिल्यांदा माझी वेळ घेतली होती. मी त्यांना येण्याचा शब्द दिला होता. म्हणून तर परवा निवडणुकीत हरलो तरी आज इथे आलो आहे. पण, अलीकडे शब्द पाळणारी लोकं कमी राहिली आहेत. सगळी माणसं खोक्याची होत आहेत. मी खोकी कोठून आणू? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण