शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 11:56 IST

ट्रेलर दाखवला, विधानसभेला पिक्चर दाखवणार

दहिवडी : खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अडचणीत आहे असं यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी भाजप नेतृत्वाला सांगितलं. हे सगळं उदयनराजेंना कळलं. त्यामुळेच खासदार झाल्यानंतर उदयनराजे हे भाजपच्या कार्यालयात ज्यावेळी गेले, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तिथे लावलेला आमदार गोरेंचा फोटो बाहेर फेकून दिला होता, असा गौप्यस्फोट सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला आहे.दहिवडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात दि. ९ पत्रकार परिषदेत अनिल देसाई बोलत होते. देसाई म्हणाले, वरकुटे मलवडी गावाने दहा वर्षे आमदार, अकरा वर्षे सभापती, सहा जिल्हा परिषद सदस्य, तीन उपसभापती अशी वेगवेगळी पदे भूषविली आहेत. परंतु, ज्यांना त्यांच्या बोराटवाडी गावातून हाकलून काढलं होतं ते आता आमची लायकी काढतायत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी सांगितले की ते ज्या उमेदवाराला सांगतील त्याला उमेदवारी दिली तर निवडून आणायची जबाबदारी घेतील. हा उमेदवार जर पडला तर पुन्हा विधानसभेला उभा राहणार नाही, हे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितले असून याला साक्षीदार आहेत.

त्यांनी दिलेला खासदार तर पडलाच. पण त्यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे बरेचसे खासदार पडलेत. आम्ही काबाडकष्ट करून, व्यवसाय करून पैसे कमावलेत. यांच्यासारख्या चोऱ्या, लबाड्या करून पैसे कमवले नाहीत. आमच्याकडे पैसे आहेतच अन् ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी शंभर टक्के वापरणार आहोत. अमित शाह यांच्यासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा समजून अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगरीबांना त्रास देणं हा यांचा उद्योग असल्याचा आरोप देसाई यांनी केला.ट्रेलर दाखवला, विधानसभेला पिक्चर दाखवणारगोरे यांच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणून असे बोलत आहेत. आपला पराभव निश्चित आहे म्हणून हे असं घाणेरडं बोलतायत. खरंतर यांची पात्रता नसली तरी यांनी आमदारकीच्या पदाची तरी लाज राखली पाहिजे. राजकारण व समाजकारणाला कलंक लावणारे हे लोकप्रतिनिधी आहेत. मला पूर्ण खात्री आहे, या आमदारांचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहत नाही. मला आता त्यांना एवढंच सांगायचंय, लोकसभेला ट्रेलर बघितलाय. आता विधानसभेला पिक्चर दाखवणार आहोत. तुम्हाला तीन महिन्याच्यावर आमदार राहू देत नाही, असा इशारा देसाई यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेJaykumar Goreजयकुमार गोरे