शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

कायम शिक्षकासाठी जवळे ग्रामस्थ आक्रमक

By admin | Updated: January 9, 2015 00:00 IST

पोलिसांची मध्यस्थी : खंडाळा पंचायत समितीवर धडकले

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील जवळे येथील प्राथमिक शाळेत कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, या मागणीसाठी जवळे ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. सात महिन्यांपासून मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने संतप्त ग्रामस्थ गुरुवारी खंडाळा पंचायत समितीवर धडकेल. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेतले.याबाबत माहिती अशी की, जवळे येथे सात महिन्यांपासून कायमस्वरूपी शिक्षक मिळालेला नाही. यासंदर्भात ग्रामस्थ वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. तरीही पंचायत समितीतील शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ गुरुवारी पंचायत समितीत आले. मात्र, त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी गटविकास अधिकारीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे खंडाळा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.जवळे येथील एक शिक्षक पुढील शिक्षणाच्या कारणाने सात महिन्यांपासून रजेवर गेले होते. त्यामुळे चार वेळा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने निवेदन दिले होते. मात्र, शाळेवर शिक्षक मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. वास्तविक रजेवर गेलेले शिक्षक बुधवार, दि. ७ रोजी शाळेवर शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने शाळेवर हजर झाले होते; पण आपण जास्त दिवस शाळेत असणार नाही, असे वक्तव्य केल्याने कायमस्वरूपी शिक्षक मिळावा, यासाठी ग्रामशिक्षण समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला टाळे ठोकण्याची भूमिका घेतली. पोलीस निरीक्षक अशोक शेळके, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, यशवंत साळुंखे यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवार, दि. ९ रोजी होणार असलेल्या मासिक सभेत निर्णय होईल, या अपेक्षेने आंदोलन स्थगित केले. शुक्रवारच्या सभेत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.यावेळी उपसरपंच अजय भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका जाधव, बापूराव पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)