शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील लाठीचार्जचा निषेध: पाटणमधे कराड-चिपळूण महामार्ग रोखला

By दीपक शिंदे | Updated: September 4, 2023 14:33 IST

निलेश साळुंखे कोयनानगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका ...

निलेश साळुंखेकोयनानगर: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ पाटण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या पाटण तालुका बंदच्या हाकेला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान बंदवेळी पाटण शहरात कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रास्ता रोको करीत मराठा समाजाने राज्य सरकारचा निषेध केला. दरम्यान, शहरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.जालन्यात मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. मात्र, त्याला शुक्रवारी गालबोट लागले. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. पाटणमध्येही मराठा समाजकडून बंदची हाक देण्यात आली होती.आज, सोमवार सकाळी 11 वाजता शहरातील झेंडाचौकात सकल मराठा समाजातील बांधव एकत्रित आले होते. अत्यावश्यक सेवा व शाळा महाविद्यालय वगळता नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत पाठिंबा दर्शविला. आठवडा बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यामुळे व्यापारीपेठेत सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. काही काळ पाटण आगारातून एसटीची वाहतूकही बंद करण्यात आली होती. या बंदमुळे लोकांची मात्र काहीकाळ गैरसोय झाली. दरम्यान, कराड-चिपळूण रस्त्यावर काही काळ रास्ता रोको केल्याने वाहतूक खोळंबली होती. यावेळी एक मराठा लाख मराठा..आदी घोषणा देत राज्यसरकारचा विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार रमेश पाटील यांना मराठा समाज बांधवांकडून निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMaratha Reservationमराठा आरक्षणjalna-acजालना