महाबळेश्वर : महाबळेश्वरची जीवनवाहिनी ओळखल्या जाणारा वेण्णालेक तलाव तुडुंब भरला असून प्रथेप्रमाणे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्या हस्ते वेण्णामाईचे जलपूजन करून पारंपरिक पद्धतीने ओटी भरून परडी सोडण्यात आली.
या वेळी उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थितीत होते. महाबळेश्वरमध्ये गेले काही दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. कोसळणाऱ्या या पावसाने पर्यटकांच्या मुख्य आकर्षणाचे ठिकाण महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या वेण्णालेक (वेण्णा तलाव) रविवारी दुपारी दुथडी भरून वाहू लागला. त्यामुळे सोमवारी प्रथेप्रमाणे महाबळेश्वराच्या नगराध्यक्षा स्वप्नाली कुमार शिंदे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह जेष्ठ नगरसेवक किसन शिंदे, युसूफ शेख, कुमार शिंदे, प्रकाश पाटील, विमलताई पार्टे, विमल ओंबळे, स्नेहल जंगम, शारदा ढाणक, श्रद्धा रोकडे, संजय पिसाळ, समाजसेवक तौफिकभाई पटवेकर, पालिकेचे आबाजी ढोबळे, शरद मस्के यांच्या उपस्थितीत वेण्णामाईचे जलपूजन करून पारंपरिक पद्धतीने ओटी भरून परडी सोडण्यात आली.