शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:18 IST

सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० ...

सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

सातारा शहरातील पोवई नाका परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. अनेक वर्षं या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते; परंतु उद्घाटनाविना हा प्रकल्प सुरू होत नसल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिकारी यांना सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. मात्र हे उद्घाटन अधिकृत नसल्याने व शासनाचा कोणताही प्रोटॉकल न पाळता ते झाले असल्याने पुन्हा एकदा रीतसर उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे.

शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुलगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.

ग्रेड सेपरेटर हे साताऱ्यात झालेले उल्लेखनीय काम आहे. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची कोंडी होत होती, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू होते.

पालिकेकडे होणार हस्तांतरण

ग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल-दुरुस्ती नगरपालिकेने पाहायची आहे. त्यामुळे हा ग्रेड सेपरेटर काही दिवसांत पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्याबाबत प्रशासकीय हालचालीदेखील सुरू आहेत.

आधी सीसीटीव्ही बसवा

ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनानंतर लावलेला फलक खाली पडला होता. या फलकामुळे सातारा शहरातील वातावरण तंग झाले होते, त्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाददेखील उमटले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा फलक फाडून जमिनीवर फेकल्याची अफवा पसरली होती; परंतु एका खासगी इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये वस्तुस्थिती समोर आली. ग्रेड सेपरेटरचे काम करत असताना आतल्या बाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सध्या रात्रंदिवस या ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरू आहे. अनेक धूम स्टाईल राइडर या ग्रेड सेपरेटरमधून गाड्या ठेवत आहेत तसेच काही चारचाकी वाहन चालकदेखील अतिशय वेगाने वाहने नेताना दिसतात. अपघात झाला तर त्याची सुतराम कल्पना पोलीस विभागाला लागणे कठीण होईल. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ग्रेड सेपरेटरमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे.

फोटो नेम : ०९जावेद ३१ प्रूफला

फोटो ओळ : सातारा येथील ग्रेड सेपरेटरमध्ये वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही बसणे आवश्यक आहे. (छाया : जावेद खान)