शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गव्याला पाव खाऊ घालणे पडले चांगलेच महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 02:14 IST

वनविभागाने बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर (जि. सातारा) : क्षेत्र महाबळेश्वर येथे रस्त्यालगत असणाऱ्या हाॅटेलमालकाला गव्याला पाव खाऊ घालणे चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाने इब्राहिम महंमद पटेल (रा. जणवाडी, महाबळेश्वर) यांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदविला आहे.त्यामध्ये क्षेत्र महाबळेश्वरमध्ये एक नागरिक गव्याला पाव खाऊ घालून त्याच्याशी बोलत असल्याचा व्हिडिओ महाबळेश्वरमधील सोशल मीडिया ग्रुपवर शनिवारी व्हायरल झाला. याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावली आहे. 

इब्राहिम पटेल  यांचे क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याजवळ शेती व हॉटेल आहे. यांच्या शेतात गेल्या काही महिन्यांपासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून पटेल हे गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा त्यांचा रोजचा उपक्रम झाला. दोघांचीही भीती मोडल्याने इब्राहिम पटेल गव्यांना हाताने पाव भरवू लागले. वन्यजिवांना खाद्यपदार्थ भरविणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी सांगितले.

मानवनिर्मित खाद्य भरविणे निसर्गविरोधी कृतीवन्यजिवांना मानवनिर्मित खाद्य भरविणे ही निसर्गविरोधी कृती आहे. त्यामुळे वन्यजिवांना सवय लागते. ज्या वेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा ते माणसांवर हल्ले करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजिवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची काळजी घेतच असतो. मोर, माकड, कबुतरे यांना बाह्य खाद्य घालू नये. वन्यजिवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही वनप्रेमींनी दिला आहे.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर