शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

गव्याला पाव खावू घालणे पडले महागात, वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 14:32 IST

gawa wildlife satara- क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल सबा गार्डनच्या मालकाला गव्याला पाव खायाला घालणे चांगलेच पडले महागात पडले आहे. वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस बजावली आहे.

ठळक मुद्देगव्याला पाव खावू घालणे पडले महागात, वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस क्षेत्र महाबळेश्वरमधील हॉटेल मालक अडचणीत

महाबळेश्वर : क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल सबा गार्डनच्या मालकाला गव्याला पाव खायाला घालणे चांगलेच पडले महागात पडले आहे. वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस बजावली आहे.याबाबत महाबळेश्वर वनविभागकडून मिळालेली माहिती अशी की, महाबळेश्वरमधील सोशल मीडिया ग्रुपवर शनिवार, दि. ६ रोजी क्षेत्र महाबळेश्वरमध्ये गव्याला एक नागरिक पाव खायला घालत आहे व बोलत असल्याची ध्वनिचित्रफीत प्रसारित झाली होती. याची दखल घेत वनविभागाने संबंधितांना वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस बजावली आहे.

वन्यजीव अभ्यासकांनी हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तो तातडीने थांबवावा, असे मत व्यक्त केले आहे होते. इब्राहिम महंमद पटेल (रा. जणवाडी, महाबळेश्वर) यांच्या नावे क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याजवळ शेती व हॉटेल आहे. यांच्या शेतात गेल्या काही महिन्यापासून सायंकाळच्या वेळेला गवे चरायला येत होते. प्राणिमात्रांवरील दयेतून इब्राहिम पटेल हे गव्यांना खाण्यासाठी पाव टाकू लागले. हा त्याचा रोजचा उपक्रम झाला.

दोघांचीही भीती मोडल्याने इब्राहिम पटेल गव्यांना हाताने पाव भरवू लागले. याची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली. वनविभागाने या ध्वनिचित्रफितीची दखल घेत इब्राहिम पटेल यांना नोटिस बजावून त्यांचा जबाब नोंदवला आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणे नियमबाह्य आहे. पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधिनियमानुसार नोटिस बजावण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी सांगितले.मानवनिर्मित खाद्य भरवणे निसर्गविरोधी कृतीवन्यजीवांना मानवनिर्मित खाद्य भरवणे हे निसर्गविरोधी कृती आहे. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना त्याची सवय लागते. ज्या वेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा माणसांवर हल्ले करून ते हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाच्या किंवा वन्यजीवाच्या जीवितास धोका पोहोचू शकतो.

निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची योग्य काळजी घेतच असतो. त्यामुळे वन्यजीवांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरे अशा प्राण्यांना बाह्य खाद्य घालू नये. वन्यजीवांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही वनप्रेमींनी दिला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान