शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी - शरद पवार 

By सचिन काकडे | Updated: May 9, 2024 17:18 IST

रयत शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची कवाडे खुली होणार

सातारा : ‘जागतिक पटलावर शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल होत आहेत. या बदलाची नोंद घेऊन रयत शिक्षण संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, गुणात्मक विकास साधत असताना आत्मनिर्भर पिढी घडविणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवारी (दि. ९) सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार सुमन पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, रामशेठ ठाकूर, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रभाकर देशमुख, शफीक शेख यांच्यासह रयत सेवक उपस्थित होते.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन शरद पवार म्हणाले, उद्योग, आरोग्य व शिक्षण अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. आपण याबाबत ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार केला असून, रयतच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. गुणवत्ता हा आज महत्त्वाचा भाग असून सतत बदल होत आहेत, या सर्वांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून, संस्थेची वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे. संस्थेचे काम अत्यंत पारदर्शी असून दीड-दोन वर्षांत केलेल्या काही धोरणात्मक बदलांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेची कार्यदर्शिका, वार्षिक अहवाल, सीआयआयआय सेंटर, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज, साउथ कोरियन सामंजस्य करार, कुंभोज येथील प्रशिक्षण केंद्र, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी माहिती दिली. सचिव विकास देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर डॉ. अनिल पाटील यांनी भविष्याचा वेध घेत रयत संस्थेकडून राबविल्या जाणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी आभार मानले.

स्मृती भवन इमारतीचा शुभारंभ..रयत संस्थेतील कर्मवीर स्मृती भवन इमारतीचे संस्थेकडून नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच संस्थेच्या वार्षिक अहवालाचे व कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या शब्दगंध अंकाचे प्रकाशनही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडले. गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव सोहळा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आला असला तरी लवकर तो आयोजित केला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारRayat Educational Instituteरयत शिक्षण संस्था