शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संजीवराजे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी सलग ६० तासांनंतरही IT'ची चौकशी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:30 IST

सगळ्या पुढाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू शकत नाही : रघुनाथराजे

फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी ५ फेब्रुवारीला सकाळी ६ वा. आयकर विभागाने छापे टाकले. पहिल्या दिवशी आयकर विभागाने संजीवराजे यांची तब्बल १७ तास चौकशी केली. दुसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. शुक्रवारी पुन्हा सकाळी लवकरच सुरू झालेली चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. अजून दोन दिवस चौकशी सुरू राहील, असे रघुनाथराजे निंबाळकर यांनी सांगितले.सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांना घेऊन त्यांच्या गोविंद मिल्क या ठिकाणी चौकशीसाठी गेले. दरम्यान, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीचे कामकाज सुरळीत सुरू होते.पुणे येथील चौकशी तब्बल ५० तासानंतर संपलीसंजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे येथील लक्ष्मी या निवासस्थानी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी तब्बल ५० तासांनंतर संपली आहे. कोणत्याही प्रकारचा संशयित व्यवहार आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीला नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी पूर्णपणे सहकार्य केले. पुण्यातील चौकशी संपली असली तरीही फलटण येथील चौकशी मात्र अजूनही सुरूच आहे. पुणे येथील चौकशी संपली हे वृत्त फलटण येथील सरोज व्हिला या निवासस्थानाबाहेर बसलेल्या कार्यकर्त्यांना समजताच या ठिकाणी असलेला तणाव निवळला.सगळ्या पुढाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू शकत नाही : रघुनाथराजेकाही जरी चेक केलं तरी काही वेडवाकडं असेल तर सापडेल. वेडवाकडं नसेल तर सापडूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यांना जी अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इस्टेटची अपेक्षा असेल ती सापडू शकत नाही. महाराष्ट्रात काहीतरी घरे असतील जी पहिल्यापासून चांगली असतील. सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तोलू शकत नाही, असेही यावेळी रघुनाथराजे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणIncome Taxइन्कम टॅक्स