शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पश्चिम भागात पाऊस सुरूच; कोयना साठ्यात एक टीएमसी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 15:29 IST

Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला २३, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देपश्चिम भागात पाऊस सुरूचकोयना साठ्यात एक टीएमसी वाढ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासात कोयना धरणसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीसाठा ४७ टीएमसीवर गेला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला २३, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पाऊस सुरू झाला आहे. मागील आठवड्यापासून पश्चिम भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस होत आहे. पश्चिमेकडे पाऊस सुरू असल्याने भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नवजा येथे ७० मिलिमीटर झाला तर जूनपासून आतापर्यंत तेथे १,५९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनेला जून महिन्यापासून १,१९८ आणि महाबळेश्वरला १,६६६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. शुक्रवारी सकाळी कोयना धरणात ४७.२० टीएमसी पाणीसाठा झाला तर गुरुवारी ४६.०३ टीएमसी साठा होता. २४ तासात कोयना धरणात एक टीएमसीहून अधिक पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही वाढली आहे. शुक्रवारी सकाळी १८,०७४ क्युसेक वेगाने पाणी येत होते.दरम्यान, जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. तरीही गतवर्षीपेक्षा यंदा अजूनही पाणी आवक कमी आहे.पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. पण, अजूनही ओढ्यांना पाणी नाही. छोटे पाझर तलाव कोरडे पडले आहेत. माण, खटाव, फलटण तालुक्यात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसSatara areaसातारा परिसर