आयटी कंपन्यांना हे हवं
करात सवलत
काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण
कुशल मनुष्यबळ
दळणवळणाची चांगली सोय
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी सुरक्षित वातावरण लागते. कंपनी उभी करताना कोणतीही अडचण आली, तर त्यावर अधिकाराने मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची आवश्यकता असते. साताऱ्यात दोन्ही राजें गटातील कलह ही अनेकांच्या मनात औद्योगिक असुरक्षिततेची नांदी वाटते. त्यामुळे आपापसातील राजकीय हेवेदावे काही काळासाठी बाजूला ठेवून साताऱ्यात आयटी हब होण्यासाठी दोन्ही राजेंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नांनी साताऱ्यात, असे हब तयार झाले, तर रोजगारनिर्मिती, पूरक उद्योगांना चालना, त्यातून पुन्हा रोजगारनिर्मिती, आर्थिक उलाढाल वाढ व त्यातून स्थानिकांचा जीवनस्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
आयटीकरांना आस आपल्या शहराची
कोविड काळाने अनेक आयटीतज्ज्ञांना आपल्या शहराशी नाळ जोडायला भाग पाडले आहे. वर्क फ्रॉम होमनंतर आता वर्क फ्रॉम एनीव्हेअर ही संकल्पना आयटी क्षेत्रात येऊ लागली आहे. मोठ्या शहरांत राहण्यापेक्षा आपल्या शहरात राहण्याला प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात नामांकित शाळा असल्याने मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. परिणामी, आयटी क्षेत्रातील तरुणाई आपल्या शहराकडे येण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांना आपल्या गावाकडे राहून रोजगार मिळणार आहे.
मोठ्या कंपन्यांना आस छोट्या शहरांची
मेट्रो पाॅलिटन शहरांमध्ये वसलेल्या आयटी कंपन्यांच्या विस्ताराला आता मर्यादा आल्या आहेत. विस्तार करण्यासाठी महानगरांमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा छोट्या शहरांच्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. मोठ्या शहरांमध्ये राहून त्या तोडीचे पगार आणि अन्य खर्चांना आळा बसविण्याचा निर्णय काही व्यवस्थापनांनी घेतला आहे. कुठूनही काम करण्याची मुभा दिल्यानंतर इमारत व इतर देखभाल खर्चासह दळणवळण आणि अन्य सोयींवर होणारा खर्चही कंपनी वाचवू शकते.
कोट :
अनुभव समृद्ध झाल्यानंतर पुन्हा आपल्या शहराकडे जाण्याची आस लागते. कोरोनाने अनेकांचे पाय त्या अर्थाने जमिनीवर आणले आहेत. त्यामुळे कुटुंबीयांसह आपल्या शहरात राहण्याचा आनंद आणि सुरक्षितता कुठेच नाही. सातारा आयटी हब झाले, तर शहराची मरगळ दूर होऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
-पवनजित माने, अध्यक्ष, फोरम ऑफ आयटी एम्प