शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील १ हजार ३२३ रेशन दुकानांना आयएसओ मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 18:17 IST

रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सातारा : जिल्ह्यातील पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा कार्यालय, ११ तालुका पुरवठा कार्यालये, २० शासकीय धान्य गोदाम व १ हजार ३२३ स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे या दुकानांना आणि कार्यालयांना नवा लुक मिळाला आहे.जिल्हाधिकारी शेखर सिंह, पुरवठा उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा कार्यालय, ११ तालुका पुरवठा कार्यालये, २० शासकीय धान्य गोदाम व १ हजार ३२३ स्वस्त धान्य दुकानांनी आयएसओ मानांकनासाठी कामकाज केले. विविध विभागात १२३७ शकल प्रलंबित होते. त्यापैकी १०३६ शकांची पूर्तता करून ते निर्गत करण्यात आले. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या तालुकानिहाय बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये आयएसओ मानांकनाबाबत सूचना देण्यात आल्या.दरम्यान, रास्तभाव दुकानदार व गोदामातील माथाडी कामगारांना ओळखपत्र व गणवेश देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून फिटनेस प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले आहे. सर्व २० गोदामांच्या आवारात ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. गोदाम, तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात पुरवठ्यांचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. रास्तभाव दुकानदारांना चलन भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुकानदारांचे उत्पन्न वाढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरची सुविधा सुरू करण्यात आली आहे.या कारणांनी मिळाले मानांकनरास्तभाव दुकान, गोदामे, कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, अभिलेख अद्यावतीकरण, दर फलक, साठा फलक, दुकान चालू-बंद करण्याच्या वेळांचे फलक दर्शनी लावणे. अद्ययावत नोंदवह्या, कार्यालय, दुकानांमध्ये सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्र, स्मोक डिटेक्टर, प्रथमोपचार पेटी, लाभार्थ्यांसाठी बैठक व पाण्याची केलेली व्यवस्था बघून आयएसओ मानांकन देण्यात येते.सीएसी सेंटरमधून मिळणार सुविधासीएसी सेंटरच्या माध्यमातून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर, बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकीट बुकिंग, सर्व प्रकारचे लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, रेशन कार्डमधील नावात दुरुस्ती अर्ज आदी प्रकारच्या सुविधा रास्तभाव दुकानदार नागरिकांना देणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर