शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कऱ्हाडमधील ‘त्या’ स्फोटाचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास करा, आमदार नितेश राणेंची मागणी 

By दीपक शिंदे | Updated: November 8, 2023 17:52 IST

सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या

कऱ्हाड : कऱ्हाड येथे एका घरात २५ ऑक्टोबर रोजी झालेला स्फोट हा कोणत्याही अंगाने सिलिंडरचा स्फोट वाटत नाही. तेथे प्रत्यक्ष बॉम्ब बनवले जात असताना त्याला गॅस सिलिंडर स्फोट दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्याचा ‘एटीएस’च्या माध्यमातून तपास झाला पाहिजे,’ अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली.कऱ्हाड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सागर आमले, राहुल यादव, शैलैंद्र गोंदकर यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.राणे म्हणाले, ‘ज्या ठिकाणी कऱ्हाडात तो स्फोट झाला आहे, त्या ठिकाणी मी भेट दिली. शेजारील लोकांशी बातचीत केली. माहिती घेतली, त्यामुळे कोणतेही अंगाने तो गॅसचा स्फोट वाटत नाही, असा मला विश्वास आहे. घटनास्थळी सापडलेली केमिकल्स, झालेल्या स्फोटाची तीव्रता, त्यात झालेले नुकसान हे सर्व पाहता कोणाच्याही मनात शंका निर्माण होईल, अशी तिथली परिस्थिती आहे. मात्र, पोलिस यंत्रणा नेमक्या कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, हे कळत नाही. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आडाखे बांधले आहेत, हेही समजत नाही. सातारा -कऱ्हाड भागात पीएफआयच्या हालचाली वाढत चालल्या आहेत. मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. साताऱ्यात व्हॉट्सॲप ग्रुपवर पाकिस्तानचे नंबर सापडत आहेत. पाकिस्तानमधून तेथील लोकांना धमकीचे फोन येत आहेत. या सगळ्या बाबी गंभीर आहेत; परंतु कऱ्हाडच्या स्फोटाबाबत पोलिस यंत्रणेवर नेमका कोणाचा दबाव आहे? जिल्हा पोलिस प्रमुख नेमके कोणाला संरक्षण देऊ पाहत आहेत? सरकारची व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करीत आहे? याचा आम्ही शोध घेतला असून, हिवाळी अधिवेशनात याबाबतची लक्षवेधी टाकणार आहे. तसेच, इथली वस्तुस्थिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या तत्काळ कानावर घालणार आहे.’

माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगाच मोठा ड्रग्ज माफिया..ड्रग्ज माफिया अलवेश यादव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आरतीला होता. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा तर सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, असे म्हणत त्यांनी मोठा आरोप केला.

श्रावण बाळ आहे, तर ५० कोटींची ऑफर कशाला?दिशा सालियन यांची दुर्दैवी घटना घडली तेव्हा आदित्य ठाकरे यांचे व तिचे मोबाइल टॉवर लोकेशन एकाच ठिकाणी आले आहे. त्यामुळे आज ना उद्या त्यांना अटक होऊ शकते. ती टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. तसेच, तक्रारदाराला त्यांच्या वडिलांकडून तक्रार मागे घेण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिल्याचेही समोर आले आहे. मुलगा श्रावण बाळ आहे, तर ५० कोटींची ऑफर कशाला, असा सवालही राणे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडBlastस्फोटNitesh Raneनीतेश राणे