शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात 'या' ठिकाणी कोसळतोय 'उलटा धबधबा'; पर्यटकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 16:45 IST

कास, ठोसेघर, कोयने पाठोपाठ हा उलटा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी

हणमंत यादवचाफळ : निसर्गाची मुक्त उधळण केलेल्या चाफळ विभागातील सडावाघापुर जवळील उलटा धबधबा ( रिव्हर्स पॉईंट ) परिसरात पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडली आहे. हे निसर्ग सौंदर्य व धबधबा पाहण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वाहतुकीची चांगली सोय असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र काही पर्यटकांकडून हुल्लडबाजी होत असल्याने पोलीस व वनविभागाची करडी नजर आहे.चाफळच्या पश्चीमेस उंच डोंगर पठारावर सडावाघापुर हे गाव पाटण तारळे रस्त्यावर वसले आहे. या गावापासुन काही अंतरावर सध्या पर्यटकांना खुणवणारा उलटा धबधबा हे ठिकाण आहे. उंब्रज चाफळ - दाढोली मार्गेही या ठिकाणाकडे जाण्यास पक्या स्वरुपाचा डांबरीकरण रस्ता आहे. कास, ठोसेघर, कोयने पाठोपाठ हा उलटा धबधबा पाहण्यासाठी सध्या पर्यटक गर्दी करु लागले आहेत. येथील निसर्गरम्य परिसर, उंच पनवचक्या व दाट धुक्याची पांझर घालत हिरवाईने फुललेला हा परिसर पर्यटकांना खुणवू लागला आहे.गत दोन वर्षे कोरोना महामारीत बंद असलेला हा परिसर यावर्षी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. रिमझिम पावसात भिजत पर्यटक या पर्यटन पंढरीचा आस्वाद घेत आहेत. पर्यटकांची वाढती संख्या पाहता स्थानिक ग्रामस्थांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. तर, हुलडबाज पर्यटकांना चाप बसावा परिसरात शांतता राहावी यासाठी ठोस कारवाई करण्यात येत आहे.

सडावाघापूर गावच्या परिसरातील उलटा धबधबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद जरुर घ्यावा. मात्र, सार्वजनिक शांततेचा भंग करु नये. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.  - अजय गोरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरtourismपर्यटन