कोपर्डे हवेली : आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघ भारत सरकारच्या पदाधिकारी निवडी कऱ्हाड येथे अविनाश नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विठ्ठल मदने यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, सुभाष नलवडे, विश्वास मोहिते, सरपंच अश्विनी मदने आदी उपस्थित होते.
यामध्ये महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी आनंदराव जाधव शेरे (ता. कऱ्हाड), सातारा जिल्हाध्यक्षपदी संदीप मदने पार्ले (ता. कऱ्हाड), सातारा जिल्हा महिला उपाध्यक्षपदी कौशल्या जाधव विरवडे (ता. कऱ्हाड), कऱ्हाड तालुका महिला अध्यक्षपदी सुनीता मदने तसेच महिला बचत गटप्रेरिका सखीपदी जयश्री मदने यांची निवड झाली.
अविनाश नलवडे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघाचे निवडी या समाजासाठी झटणाऱ्या लोकांच्या झाल्या असून, त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते योग्यप्रकारे पार पाडतील; परंतु त्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकारांची आणि कायदेशीर गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी एखादी कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे.’ कार्यक्रमाचे डॉ. कृष्णा मदने यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ...
महिला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुनीता मदने यांचा सत्कार करताना अविनाश नलवडे, डॉ. विठ्ठल मदने आदी उपस्थित होते.
फोटो सातारा लोकमत मेल.