शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गरजूंसाठी ‘उन्नती’ सज्ज महिला उद्योजिका एकवटल्या : वर्षातून एका कुटुंबाला दिली जातेय भरीव आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:33 IST

सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या.

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या. टिपिकल बिशी न बिशीची संज्ञा बदलण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. वर्षातून एक गरजवंत शोधून त्याला आवश्यक ती मदत बिशीच्या पैशातून केली जाते.

साताऱ्यातील काही महिला उद्योजिका उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने परिचित झाल्या. परस्परांना महिन्यातून एकदा भेटण्याचं निमित्त म्हणजे बिशी ही संकल्पना मनात पक्की झालेली. त्यामुळे काहींनी बिशीची आयडीया मांडली. कुठल्याही गोष्टीत आपण आरंभशूर असू नये, हे त्यांनी मनाशी पक्के केलेले. त्यामुळे बिशीवर जोरदार चर्चा झाली. आपापल्या व्यवसायात मग्न असताना उगीचच नाष्टा आणि खाण्याच्या निमित्ताने एकत्र येण्याचं काही कोणाला पटेना आणि मग प्रत्येकीने डोकॅलिटी लढवली. यातून ‘उन्नती’ या गटाची स्थापना झाली.

आपल्यासह इतरांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करण्याचं निश्चित झाल्यानंतर १७ जणींचा ग्रुप तयार झाला. महिन्यातून एकदा शंभर रुपये देण्याच्या निमित्ताने त्यांची भेट व्हायची. १२ महिने पैसे साठल्यानंतर परस्परांच्या ओळखीने गरजू महिला शोधण्याची तयारी झाली. पहिल्याच वर्षी दोन शिवणयंत्र देऊन उद्योजिका घडविण्याचं उद्दिष्ट सफल होताना त्यांना दिसते. दुसºया वर्षी हुशार; पण हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या तरुणीला मदत करण्याचं निश्चित झालं. त्याचवेळी एक महिला वडापावचा गाडा सुरू करायचं सांगून त्यात काही मदत करता येते म्हणून ‘उन्नती’कडे आली.

वर्षभराची साठलेली रक्कम आणि उपलब्ध मागणी यांची तफावत होती. झालं मग काय प्रत्येकीने त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि एकाच वर्षात दोघींनाही सबळ करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर वेचले जिल्हा परिषद शाळेत मुलांना मल्लखांबची आवश्यकता असल्याचे त्यांना कळलं. झालं त्यावर्षी शाळेत मल्लखांब उभा करण्याचा चंगच या ग्रुपने बांधला. त्याद्वारे या शाळेने उत्कृष्ट मल्लखांबपटू निर्माण केले. यावर्षी निकिता सोनटकले या आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडूला दुबईत स्पर्धेसाठी किट हवं होते. हे किट घेण्यासाठी ‘उन्नती’ने हात पुढं केला. महिलांनी महिलांच्या उन्नतीसाठी सुरू केलेली ही धडपड मार्गदर्शक आहे.डब्यातून स्नेहभोजनडॉ. मृणालिनी कोळेकर, मंजूषा शेठ, नेहा दोशी, वैशाली दोशी, मंजिरी दीक्षित, दीपाली भागवत, सायली मुतालिक, अंजली देशपांडे, दीपा काटदरे, शोभा कुलकर्णी, श्रृती कुलकर्णी, विद्या हिरेमठ, सुषमा भिडे, सुनीता शहा आणि मीरा गुजर. स्वत:च्या हिमतीवर साम्राज्य उभ्या करणाºया या महिला वर्षातून एकदाच मदत देण्याच्या निमित्ताने भेटतात. आपापल्या घरातून डबा आणून त्या स्नेहभोजनाचा आनंद घेतात.दुबई येथे होणाºऱ्या अंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत निकिता सोनटकले हिला आवश्यक किटचे वितरण ‘उन्नती’च्या वतीने करण्यात आले.