शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: राष्ट्रध्वजाचा अपमान; केसुर्डीतील कंपनी व्यवस्थापकांसह दोघांना न्यायालयाने ठरवले दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 18:28 IST

मुराद पटेल  शिरवळ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी ...

मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमधील एका कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले. तर प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आठ दिवस साधी कैद सुनावली. केसुर्डी येथे थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ३ मार्च २०१५ रोजी एका कार्यक्रमात अमेरिकेच्या झेंड्यासहीत भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. तर रेडियमने कंपनीची माहिती दर्शविणारा दिशादर्शक फलक लावून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी खंडाळा पोलिस स्टेशनला ४ जून २०१५ रोजी तक्रारी अर्जावरुन कंपनीचे व्यवस्थापक मोहन शंकर पाटील (वय ७१, रा.पिंपरी,पुणे), सुहास पुंडलीक गर्दे (वय ५४, रा. कर्वेनगर, कोथरुड, पुणे) यांच्याविरुध्द राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ चे कलम २ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक संभाजी म्हेञे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पोपट कदम यांनी तपास करीत २१ आँक्टोंबर २०१५ रोजी खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपञ दाखल केले होते. याप्रकरणी न्यायाधीश एस.जे.कातकर यांच्यासमोर सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील स्मिता चौधरी, सरकारी सहाय्यक अभियोक्ता एस.डी. भोसले यांनी आठ साक्षिदार तपासले. सरकारी अभियोक्ता एस.डी.भोसले यांनी केलेला युक्तिवाद, प्रत्यक्षदर्शी पुरावा, साक्षिदार व कागदपञ ग्राह्य मानत कंपनी व्यवस्थापक मोहन पाटील, सुहास गर्दे यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २७१ फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८ (२) अन्वये राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम २ अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येकी पन्नास हजार रुपये असा एक लाख रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी आठ दिवसांची साधी कैद सुनावली. सरकारी पक्षातर्फे वकील एस.डी.भोसले यांनी कामकाज पहिले. तर त्यांना प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पोलीस अंमलदार शिवशंकर शेळके, पोलीस अंमलदार मंगल हेंद्रे, पोलीस अंमलदार पूनम गायकवाड यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCourtन्यायालय