शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

भूगर्भातील खनिजांची अमेरिकेत तपासणी - जिल्ह्यात सर्वेक्षण : लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:25 IST

महेंद्र गायकवाड ।पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यापासून ते सातारा जिल्ह्यापर्यंत अनेक गावांमध्ये हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल तसेच खनिजद्रव्यांच्या साठ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.उपग्रहावरून मिळालेल्या माहितीच्या ...

ठळक मुद्देहायड्रोकार्बन, डिझेल, पेट्रोल तसेच अन्य खनिजद्रव्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू

महेंद्र गायकवाड ।पाचवड : भारत सरकारच्या ओएनजीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये निवडक राज्यांमध्ये भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासण्यासाठी विविध खासगी कंपन्यांना सर्वेक्षण करून चाचणी करण्याचे काम देण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यापासून ते सातारा जिल्ह्यापर्यंत अनेक गावांमध्ये हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल तसेच खनिजद्रव्यांच्या साठ्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

उपग्रहावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे जमिनींमध्ये शंभर ते दीडशे फुटांपर्यंत बोर काढण्यात येते. या बोरमध्ये कॅमेरे सोडून जीपीएस प्रणालीद्वारे माहिती संकलन केली जाते. माहितीबरोबरच संबंधित जमिनीतील पाणी व अन्य द्रव्यांचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी अमेरीका व साऊथ आफ्रिका याठिकाणी पाठवले जाते, अशी माहिती अल्फाजिओ इंडिया लिमिटेडचे पी. बाला भास्करराव यांनी दिली. वाई शहराबरोबरच धोम, पसरणी, भुर्इंज, सुरूर, ओझर्डे, पाचवड, व्याजवाडी व आसले या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील सातारारोड, रहिमतपूर, कुमठे, शिरंबे, वाठार किरोली, पिंंपोडे बुद्रुक, वाठार स्टेशन, किन्हई या गावांमधील काही ठिकाणच्या जमिनीतील खनिजद्रव्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. दरम्यान हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल

तसेच खनिजद्रव्यांचे साठे कोणकोणत्या गावांमध्ये सापडले आहेत? याविषयी विचारले असता संकलित केलेल्या सर्व माहितीचे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर ते समजणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.... तर मोठे उत्खनन होण्याची शक्यतावाई तालुक्यातील धोम, पसरणी, भुर्इंज, सुरूर, ओझर्डे, पाचवड, व्याजवाडी व आसले ही गावे बागायत शेतीची गावे म्हणून प्रसिध्द आहेत. जर या गावांमध्ये हायड्रोकार्बन, डिझेल व पेट्रोल तसेच खनिजद्रव्यांचा साठा सापडला तर भविष्यात या गावांमध्ये मोठे उत्खनन होण्याची शक्यता नाकारता येत नसून पर्यायाने येथील शेती व शेतकरी यांच्यावर मोठे संकट निर्माण होण्याची भितीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत केली जात आहे.

या संशोधनात शंभर ते दीडशे फूट बोर मारण्यात आलेल्या आहेत. बोर मारलेल्या अनेक ठिकाणी पाणी लागलेले आहे. त्यामुळे याठिकाणी गौणखनिज सापडो अथवा न सापडो परंतु आम्हा शेतकºयांना मोफत बोर मारून मिळाल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळाल्याचा आनंद मिळाला आहे. अशाप्रकारे ओएनजीसीकडून ऐन उन्हाळ्यात आम्हा शेतकºयांना ही मोठी भेटच मिळाली आहे.- संभाजी शेवते, शेतकरी, फुलेनगर भुर्इंजभुर्इंज (फुलेनगर) ता. वाई येथील भूगर्भातील खनिजद्रव्यांचे साठे तपासणीचे काम मंगळवारी यंत्राच्या साह्याने करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater pollutionजल प्रदूषण