शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विजेचा झटका बसल्याने खांबावरुन पडून जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 15:31 IST

karad mahavitran satara- कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरूस्ती करत असताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडल्याने जनमित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमीवर कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे जखमी जनमित्राचे नाव आहे.

ठळक मुद्देविजेचा झटका बसल्याने खांबावरुन पडून जखमीजखमीवर कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू

कुसूर/कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे विद्युत बिघाड दुरूस्ती करत असताना विजेचा धक्का लागून खांबावरून खाली पडल्याने जनमित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. जखमीवर कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रजित थोरात (वय २४, रा. चचेगाव, ता. कऱ्हाड) असे जखमी जनमित्राचे नाव आहे.सविस्तर माहिती अशी, कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथील सबस्टेशन अंतर्गत असलेल्या आणे येथील नांगरे वस्तीवरील शेतीपंप लाईनला बिघाड झाला होता. हा बिघाड दुरूस्ती करण्यासाठी इंद्रजितसह अन्य एक जनमित्र आणि लाईनमन हे तिघेजण आणे येथे गेले होते.

यावेळी कोळेवाडी येथून आलेला विद्युत पुरवठा रोहित्र बंद करून विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यानंतर खांबावरील बिघाड दुरूस्तीसाठी इंद्रजित खांबावर चढला. मात्र तांबवे येथील सबस्टेशनवरून या लाईनला वीजपुरवठा सुरू असल्यामुळे काही सेकंदात विजेचा जबर धक्का लागला. यामध्येच खांबावरून खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाला. यावेळी सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कऱ्हाड येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रिंगफिडिंगमुळे फटकावीज बिघाड दुरूस्तीसाठी इंद्रजित ज्या खांबावर चढला होता. त्या खांबावर रिंगफिडींग होते. परिणामी कोळेवाडी सबस्टेशनवरून आलेला विद्युत पुरवठा खंडित केला असला तरी तांबवे सबस्टेशनवरून आलेला उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू होता. या ठिकाणी काही वर्षे विद्युत बिघाड झाला नसल्यामुळे व या भागात नविन कर्मचारी असल्यामुळे रिंगफिडींग असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे हा अपघात घडला.विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वेगवेगळ्याकोळेवाडी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावात गावठाण आणि शेती पंपाना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईन वेगवेगळ्या आहेत. गावठाणाला विद्युत पुरवठा करणारी कमी दाबाची सिंगल फेज लाईन आहे. तर शेती पंपासह मोठ्या उद्योजकांना विद्युत पुरवठा करणारी उच्च दाबाची थ्रीफेज लाईनद्वारे वीजपुरवठा केला जातो.

टॅग्स :mahavitaranमहावितरणKaradकराडSatara areaसातारा परिसर