शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी घेणार पुढाकार : विजय शिवतारे

By admin | Updated: October 2, 2016 00:53 IST

बैठकीत माहिती : शांततेने महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

सातारा : ‘ज्याप्रमाणे बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत बंधने घालण्यात आली आहेत. त्याप्रमाणे चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्याचे बंधन घालणे गरजेचे आहे. मुलांना शैक्षणिक कर्ज मिळाले तर त्यांचे करिअर घडेल. कर्ज दिलेल्यामधील ६० टक्के मुलांनी जरी कर्ज फेडले तरी भरपूर आहे. इतर कर्ज सरकार भरेल. नाहीतर अडचणीत आलेल्या कारखान्यांचे पैसे सरकार भरत असते, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चातून गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळाले पाहिजे. साताऱ्यात होणाऱ्या महामोर्चात मराठा बांधवांनी हिंसाचाराला बाजूला ठेवून शांततेत महामोर्चा पार पाडावा,’ असे आवाहन त्यांनी केले. येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात मराठा क्रांती महामोर्चाबाबत मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच संयोजन समितीने मराठा आरक्षणाबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. शिवतारे म्हणाले, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बाजू मांडल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सातारा शहरात निघणाऱ्या महामोर्चाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले. मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या सदस्यांनी ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी मराठा समाजातील ९० ते ९५ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विना डोनेशन शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. शिवतारे यांनी आरक्षणामुळे कमी टक्केवारी त्यांना क्लार्क म्हणून काम करावे लागत आहे. त्यानंतर प्रमोशनचीही तशीच विदारक अवस्था आहे. सगळी पडीक कामे आज मराठा समाजातील लोकांना करावी लागत आहेत. (प्रतिनिधी) ५० वर्षांची खदखद बाहेर महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाची गेल्या ५० वर्षांची खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आंदोलनातून आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी सरकारकडे माझी शिष्टाई सुरू आहे. सातारा येथे होणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले. हुल्लडबाजांना रोखावे वातावरण निर्मितीसाठी रॅली योग्य आहे; पण काही अतिउत्साही कार्यकर्ते हुल्लडबाजी करू लागले आहेत. चारचाकी व दुचाकीवर झेंडे लावून गाडी आडवी मारणे अशा पद्धतीने अरेरावी करणे चालू आहे. शुक्रवारपासून तक्रारी येत आहेत. आज मी समक्ष दोन ठिकाणी पाहिले त्यांना समजावून सांगितले. आपला अन्यायाविरुद्धचा निषेध मूक महामोर्चा आहे. तेव्हा नीट वागा संयम सोडू नका. प्रसारमाध्यमांनी यासाठी आवाज उठवावा, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी केली.