शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वस्तीत रानगव्यांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 21:09 IST

Forest Department Satara- खंडाळा तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला आहे. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे.

ठळक मुद्देनागरी वस्तीत रानगव्यांचा शिरकावशेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन

खंडाळा : तालुक्यातील कोपर्डे गावच्या हद्दीत काही शेतकऱ्यांना रानगव्यांचा कळप दिसून आला आहे. येथील राखीव वनक्षेत्रातून हे रानगवे गावशिवारात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीतील शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे.कोपर्डे गावच्या शिवाराशेजारी डोंगरालगत राखीव वनक्षेत्र आहे. त्यामुळे येथे जंगली प्राण्यांचा नेहमीच वावर दिसून येतो. लांडगे, तरस, कोल्हे, ससे, रानडुक्कर, हरीण यासह अनेक वन्यप्राणी येथे आढळून येतात. मात्र, काही दिवसांपासून गावशिवारात रानगवे दिसून आल्याने आश्चर्यासह भीती व्यक्त केली जात आहे.

वास्तविक या डोंगरालगत गावकऱ्यांची शेती असल्याने शेतकामासाठी शेतकऱ्यांची नेहमीच ये-जा असते. रविवारी सकाळी गावातील शेतकरी अनिल बोडरे, मोहन बोळे यासह काही तरुण धोम-बलकवडी कालव्यावरून जात असताना त्यांना गव्यांचा कळप दिसून आला. कळप ऊस आणि पेरूच्या बागेत घुसल्याने शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या भागात शेतीच्या कामासाठी जाताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागSatara areaसातारा परिसर