शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात ‘आय फ्लू’ फैलावतोय; 'इतके' आहेत रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 12:46 IST

डोळ्यांचा संसर्ग सौम्य असला तरी त्याचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर

संजय पाटीलकऱ्हाड (सातारा) : पुणे, मुंबईसह राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये पसरलेली डोळ्यांची साथ आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या ‘आय फ्लू’चे संक्रमित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून, दिवसेंदिवस संक्रमण वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६३६ रुग्णसंख्या आहे.सततचा पाऊस आणि दूषित पाण्यामुळे सध्या किटाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यातच आता डोळ्यांमध्ये किटाणूंचा संसर्ग होऊन अनेकांना डोळ्यांचे आजार जडले आहेत. वातावरणातील अनिश्चित बदलांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सुरुवातीला पुणेसह मुंबई विभागात डोळ्यांची साथ पसरली. त्यानंतर संसर्ग झपाट्याने वाढत जाऊन ग्रामीण भागातही रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. डोळ्यांचा संसर्ग सौम्य असला तरी त्याचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यातच काही ठिकाणी शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्याचे दिसते.प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयातही सध्या ‘आय फ्लू’चे रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात पन्नासपेक्षा जास्त रुग्णांवर औषधोपचार केले जात असून, हा आकडा वाढतच असल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले.

रुग्णसंख्या ६३६; उपचारात ३७८जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये २७ जुलैपासून आजअखेर डोळे येण्याच्या विषाणूजन्य साथीचे एकूण ६३६ रुग्ण नोंदले गेले आहेत. त्यापैकी २५८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. तर ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

...असा करा बचाव

  • वेळोवेळी हात स्वच्छ करा.
  • सतत डोळ्यांना स्पर्श करू नका.
  • आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा.
  • वेळोवेळी स्वच्छ पाण्याने डोळे धुवा.
  • बाहेर जाताना डोळ्यांवर चष्मा घाला.
  • संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा.
  • संक्रमित व्यक्तीचे बेड, टॉवेल किंवा कपडे वापरू नका.

...ही आहेत लक्षणे

  • डोळे लाल होऊन द्रव येणे.
  • डोळ्यातून सतत पाणी येणे.
  • डोळे चोळावेसे वाटणे.
  • डोळ्यांना अचानक सूज येणे.
  •  पापण्या एकमेकांना चिकटणे.
  • डोळ्यातून घट्ट स्राव येणे.
टॅग्स :Satara areaसातारा परिसर