शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

औद्योगिक वसाहतीला ग्रहण! ; खंडाळा तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:32 IST

तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.

ठळक मुद्दे नियोजन सहा टप्प्यांचे मात्र अडखळली तिसऱ्या टप्प्यातच

खंडाळा : तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आले. परंतु सहा टप्प्यांचे नियोजन असलेली एमआयडीसी तिसºया टप्प्यातच अडखळली आहे. उद्योग वाढींच्या धोरणांचा अभाव व भूसंपादनाच्या जाचक अटींमुळे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाला ग्रहण लागले असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यात केसुर्डीच्या विशेष आर्थिक क्षेत्राचाही ( सेझ ) समावेश आहे.

वास्तविक सुमारे सहाशे कंपन्यांचे उभारणीचे नियोजन आहे. सध्या तालुक्यात शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असले तरी उर्वरित कंपन्या कधी पाय रोवणार, हेसुद्धा महत्त्वाचे आहे.तालुक्यात कारखानदारी वाढू लागली तशी त्यासाठी जमिनींची मागणीही वाढली. साहजिकच त्यामुळे जागेच्या उपलब्धतेसाठी संघर्ष राहू लागला आहे. खरंतर ज्या जमिनी शेतीसाठी विकसित होऊच शकत नाहीत, अशा जागा विकण्यावर शेतकऱ्यांचा कटाक्ष राहिला; पण याचे प्रमाण वाढताच काही गावांतून शेतकरी अल्पभूधारक झाला. त्यामुळे बागायती क्षेत्रात भूसंपादनाला विरोध वाढू लागल्याने कंपन्यांना जागा मिळणे अवघड बनले आहे.

त्यातच खंडाळा एमआयडीसीला पूरक म्हणून पुरंदर तालुक्यात नियोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही मुहूर्त ठरत नसल्याने तालुक्यातील इतर कंपन्यांची उभारणी ठप्प आहे. त्यामुळे औद्योगिक विस्तारासाठी यावर मार्ग निघणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्योजकांना थोडाफार दिलासा मिळावा अशी अपेक्षा आहे.आर्थिक मंदीचा फटका...देशात सुरू असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक कारखान्यांमध्ये उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. अनेक कारखाने महिन्यातून काही दिवस बंद राहतात. नवीन कारखानदारांनी या वसाहतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

खंडाळा तालुक्यात औद्योगिक वसाहतीचा विस्तार सुरू असला तरी सध्याच्या आर्थिक मंदीचा फटका उद्योगांना बसत आहे. मोठ्या कारखान्यांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांवरही त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यात सध्या नव्या उद्योगांची उभारणी ठप्प आहे. छोट्या उद्योगांमधील उत्पादन घटले आहे.- महेश राऊत, लघु उद्योजक खंडाळा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसी