शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतातील सर्वात उंच , आकर्षक वजराई धबधब्यास मान्यता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:37 IST

देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात

ठळक मुद्देबुटाची प्रतिकृती उभारणार धबधबा पाहण्यास लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पावसानंतर मुंबईतील वाळकेश्वर येथे असलेल्या ‘म्हातारीचा बूट’ची प्रतिकृती भांबवली येथे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रतिकृतीतून सह्याद्री पर्वतरांगांमधील निसर्गसौंदर्याचा आनंद ल

बामणोली : देशातील सर्वात उंच व आकर्षक धबधबा म्हणून सातारा तालुक्यातील भांबवली येथील वजराई धबधब्याला स्थान मिळाले आहे. वन विभागाच्या माध्यमातून भांबवली वजराई धबधबा या पर्यटनस्थळाचा कायापालट केला जात आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच संयुक्त वन व्यवस्थापन समिती भांबवली व वन विभागाच्या सहकार्याने प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे यंदापासून पर्यटकांना सशुल्क प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती वन समिती व वन खात्याकडून देण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील कास पुष्प पठार, ठोसेघर धबधबा, बामणोली परिसरातील शिवसागर तलाव आदी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी देशभरातून अनेक पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्याचबरोबर भांबवली येथील वजराई धबधबा हेही प्रेक्षणीयस्थळ आहे. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी सोयी-सुविधा नसल्यामुळे हा परिसर दुलर्क्षित होता. हा धबधबा घनदाट जंगलाने व्यापलेला असून, धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द झाडेझुडपे व घसरड्या पायवाटेने धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटनास जाण्यास अनेकजण उत्सुक नसतात.

भांबवली धबधब्याची उंची तब्बल १८४० फूट असून, नैसर्गिक विविधतेने नटलेल्या देशातला एक नंबरचा धबधबा व जगातले मोठे पुष्प पठार असल्याने आधुनिक पर्यटनस्थळ विकसित करण्याचा मानस वन विभाग, महाराष्ट्र शासनाचा आहे. त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर उंच कड्यावरून तीन टप्प्यांत कोसळणाऱ्या या धबधब्याची अखेर शासनाने दखल घेतली व ‘क’ वर्ग पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या धबधब्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यामुळे पर्यटन सोयीसुविधांचे काम सुरू आहे.भांबवली धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलव्याप्त व घसरड्या उताराच्या ठिकाणी पायºया व रेलिंगचे काम झाले आहे. यंदाच्या पर्यटनाच्या हंगामात या ठिकाणी स्वच्छतागृह, तिकीट केबीन, माहितीदर्शक फलक, सूचना फलक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सोयी सुविधा टप्प्याटप्प्याने पुरविल्या जात आहेत.भांबवली येथील वजराई धबधबा विकसित करण्यासाठी लागणारे पूर्ण पाठबळ पुरविणार तसेच राज्य शासन व जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, सातारा विधानसभापर्यटकांना डोंगरातून सुरक्षित उतरण्यासाठी पायºया व रेलिंगच्या सुविधा पुरविल्या आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन खात्याच्या सहकार्याने पर्यटकांना सर्वतोपरी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे, तरी पर्यटकांनी निसर्गाचा आस्वाद घ्यावा.- रवींद्र मोरे,पर्यटनप्रमुखसह्याद्री पठार विकास संघभांबवली येथील वजराई धबधबा तीन टप्प्यात खळखळून वाहत आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग