शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

खाकीची रोगप्रतिकारशक्ती वाढली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:40 IST

पौष्टिक आहाराबरोबरच प्राणायाम अन् व्यायामावर दिला भर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना गतवर्षी ...

पौष्टिक आहाराबरोबरच प्राणायाम अन् व्यायामावर दिला भर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : फ्रन्टलाइनवर काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना गतवर्षी कोरोनाने अक्षरश: घेरले होते. रोज दहा ते बारा पोलीस बाधित आढळून येत होते. त्यामुळे जिल्हा पोलीस दल चिंतित होते. मात्र यंदा पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असून, ६०० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. याला एकमेव दोन कारणे असून, पहिले कारण लसीकरण शंभर टक्के पूर्ण झाले असून, दुसरे कारण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न फळाला आले आहेत.

जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला. त्यावेळी रस्त्यावर भरउन्हातानात उभे राहून कोरोनाला छातीवर झेलणारे पोलीस कर्मचारी खंबीरपणे आपले कर्तव्य पार पाडत होते. मात्र कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावला. रोज हजारो प्रवाशांशी पोलिसांचा संपर्क येऊ लागला. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी बाधित आढळून येऊ लागले. पोलीस दल अक्षरश: हबकून गेले होते. परंतु गतवर्षीचा अनुभव यंदा पोलिसांच्या कामी आला. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पहिल्या टप्प्यात लसीकरण करून घेतले. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण आता शंभर टक्क्याच्या मार्गावर आहे. परंतु हे लसीकरण करत असतानाच पोलिसांनी भर दिला तो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर. पौष्टिक आहार त्याबरोबरच सकाळी प्राणायाम तर काहीजण घरात व्यायाम करत आहेत तसेच दोरउड्या मारणे असे घरगुती व्यायाम अनेक कर्मचारी करत आहेत त्यामुळे यंदा कोरोनावर ६०० पोलीस कर्मचाऱ्यांनी मात केली.

चौकट: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज व्यायाम, ग्रीन ज्यूस

यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पोलिसांनी सर्वात जास्त प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला. रोज सकाळी धावणे, व्यायाम करणे त्याबरोबरच ग्रीन ज्यूस तसेच कडधान्य, फळे खाणे यावर पोलिसांनी भर दिला. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे अनेकांना कोरोनाची लागणसुद्धा झाली नाही.

कोट : गेल्यावर्षी कोरोनाच्या धास्तीमुळे बाहेर ड्यूटीवर जाताना काळजी वाटत होती. मात्र हळूहळू कोरोनाची भीती मनातून गेली. त्याचे कारण म्हणजे स्वतः फिट राहण्यासाठी प्रयत्न करतोय. वेळ मिळेल त्यावेळी व्यायाम करतोय आणि चांगला आहारही घेतोय. इतरांनीही रोज थोडा तरी व्यायाम करणे गरजेचे आहे.

- शरद बेबले, पोलीस कर्मचारी

कोट: रोज सकाळी पौष्टिक आहाराबरोबरच व्यायामही आणि प्राणायाम करतो. त्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते. चांगला आहार ठेवल्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली वाढते. त्यातच लसीकरणही केले आहे. त्यामुळे यंदा फारशी चिंता वाटत नाही.

दीपक पोळ, पोलीस कर्मचारी

कोट: जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले आहे. त्यामुळे यंदा फारसे पोलीस कर्मचारी बाधित आढळून आले नाहीत. ही एक जमेची बाजू आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती झाल्यामुळे चांगला आहार आणि व्यायामही कर्मचारी करतात परिणामी सर्वांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढली आहे.

विजय कुंभार, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा