शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

दुर्गम पांगारेने जपली नाट्यपरंपरा

By admin | Updated: April 19, 2016 01:03 IST

मंडळात स्थानिक कलाकार : १९५७ पासून ५९ प्रयोग यशस्वी

सातारा : तालुक्यातील परळी भागातील सुमारे २५० उंबरठ्यांचे पांगारे हे छोटेसे गाव. लोकांनी कार्यकर्तृत्वाने गावाची ओळख सर्वदूर पोहोचविली आहे. १९५७ मध्ये गावातील तरुणांनी एकत्र येऊन ‘देवता’ या नावाने नाट्यमंडळाची स्थापना केली. गावातील हौशी कलाकारांनी मंडळ स्थापनेपासून आजअखेर दरवर्षी एक या प्रमाणे तब्बल ५९ नाटकांची निर्मिती करून ती यशस्वीपणे गावातील यात्रेत सादर केली आहेत.रोजगार, नोकरीच्या निर्मितीने पांगारे येथील अनेक तरुण मुंबई, ठाणे व पुणे शहरात कार्यरत आहेत. काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द होती. मुंबईत राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन १९५७ मध्ये ‘देवता’ नाट्यमंडळाची स्थापना केली. एप्रिल महिन्यात पांगारेची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत नाटक सादर करण्याची परंपरा सुरू झाली. गावातील कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून दाद मिळू लागली. त्यामुळे नाटक करणाऱ्या मंडळींचा उत्साह वाढत गेला. पांगारेकरांची नाट्यकला दिवसेंदिवस बहरत गेली. आजअखेर केलेल्या नाटकांपैकी देवता, रक्तात रंगला गाव, यळकोट मल्हार, राखणदार, बेरड्याची औलाद, ठिणगी, चिकणी बायको दुसऱ्याची ही नाटके रसिकांनी डोक्यावर घेतली. आजअखेर पांगारेकरांनी नाट्यपरंपरा जोपासली आहे.दिवंगत यशवंत बबन जाधव यांच्या प्रेरणेतून ‘देवता’ नाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. पहिले नाटक देवता खूपच गाजले. कोणताही वारसा किंवा आवश्यक साहित्य हाताशी नसताना प्रचंड खटाटोप करून पांगारेकरांनी ही नाट्यपरंपरा जपली आहे. यंदा १७ एप्रिल रोजी झालेल्या यात्रेत ‘शपथ तुला या मंगळसूत्राची’ हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)