वाई : अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे व सहायक प्राध्यापक डॉ. संदीप वाटेगावकर यांना जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळाले आहे.स्कॉलर जीपीएस या संस्थेने आजीवन व मागील ५ वर्षांतील जागतिक संशोधकांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये जगभरातील नामवंत संशोधकांचा समावेश आहे. डॉ. झांबरे व डॉ. वाटेगावकर यांच्या नावांच्या समावेशाने किसन वीर महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत असणारे डॉ. वाटेगावकर यांना संशोधनाची प्रचंड आवड आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून, महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे, श्री. भीमराव पटकुरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत वाईचे प्रा. डॉ. झांबरे, डॉ. वाटेगावकर; अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेचे सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:22 IST