शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari 2025: ग्रामविकासमंत्री १४० किलोमीटर पालखी मार्गाची करणार पाहणी 

By नितीन काळेल | Updated: June 5, 2025 19:40 IST

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; पंढरपूरला उद्या दुपारी सुरूवात; नीरापर्यंत दौरा

नितीन काळेल सातारा : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे उद्या, शुक्रवारी (दि. ६) पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत. याची सुरूवात दुपारी पंढरपूर येथून होणार आहे. तर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नीरा दत्त घाट येथे ही पाहणी संपेल. सुमारे १४० किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे.पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. हा सोहळा पुणे, सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात जातो. या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग, तळावरील सोयीसुविधा, उपाययोजना याबाबत प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच सोहळा सुरू होण्यासाठी काही दिवसच राहिले आहेत. त्यामुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे हे पालखी मार्ग आणि तळांची पाहणी करणार आहेत.शुक्रवारी सकाळीच मंत्री गोरे हे पंढरपूरमधूनच पाहणीला सुरूवात करणार आहेत. सकाळी साडे दहाला पंढरपूरमधील ६५ एकर पालखी स्थळ, वाळवंट, आषाढी वारीसंबंधित सर्व स्थळांची विभागस्तरीय तसेच सोलापूर जिल्हास्तर आणि पंढरपूर पालिका अधिकाऱ्यांबोबर पाहणी करणार आहेत. त्यानंतर साडे आकरा वाजता पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वारी संदर्भात आढावा बैठक होणार आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास वाखरी येथे पालखी तळ पाहणी, त्यानंतर भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस आणि नातेपुते येथे सोलापूर जिल्ह्यातील पालखी तळाची ते पाहणी करतील.दुपारी चार वाजता त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन होईल. फलटण तालुक्यातील बरड येथे पालखीतळ पाहणी करतील. त्यानंतर फलटण, तरडगाव येथे पाहणी करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता खंडाळा तालुक्यातील लोणंद येथे आगमन आणि पालखी तळ पाहणी होईल. सायंकाळी साडे सहाला निरा दत्तघाट आगमन अन् पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पावणे सातच्या सुमारास पुण्याकडे प्रयाण करणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरJayakumar Goreyजयकुमार गोरे