शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:10 IST

सहा दरवाजे पाच फुटांवर, ३५ हजार क्यूसेक विसर्ग, धोम, वीर अन् कण्हेर धरणातूनही पाणी सोडले; नद्यांच्या पातळीत वाढ   

नितीन काळेलसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी रात्री सहा दरवाजे पाच फुटांनी उचलून ३३ हजार तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ३५ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच धोम, वीर आणि कण्हेर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आल्याने नद्यांच्या पाणीपातळी वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात १५ आॅगस्टनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पूर्व भागात पावसाची रिपरिप असलीतरी पश्चिमेकडे मात्र मुसळधार सुरू आहे. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, कोयना आणि उरमोडी या प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडतोय. यामुळे धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आवक होत आहे. ही सर्वच धरणे ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्गातही सतत वाढ होत आहे.

कोयना धरणाच्या दरवाजातून रविवारपासून पाणी सोडण्यात येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातच धरणात आवक वाढल्याने सोमवारी दुपारी चार वाजता सहा दरवाजे दीडवरुन तीन फुटापर्यंत उचलून विसर्ग सुरू केला. त्यानंतर आवक वाढल्याने रात्री आठ वाजता दरवाजे पाच फुटापर्यंत वर घेण्यात आले. त्यातून ३३ हजार क्यूसेक आणि पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. सायंकाळी पाच वाजता कोयना धरणात ४५ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात सुमारे ९७ टीएमसी साठा झालेला. ९२ टक्के धरण भरले आहे.

अनेक पूल पाण्याखाली जाणार; सतर्कतेचा इशारा...सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. सायंकाळी ४ हजार २०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतरही वाढ करण्याचे नियोजन होते. यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने काही पूल पाण्याखाली जाणार आहेत. तर वीर धरणातून २२ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नीरा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धोम धरणातूही विसर्ग वाढणार असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. यामुळे वाई आणि सातारा तालुक्यातील काही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसKoyana Damकोयना धरण