शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

 अजित पवार युतीत, महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिली; शंभूराज देसाईंचा हल्लाबोल  

By नितीन काळेल | Updated: July 7, 2023 19:04 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार आणि धोरण बदलले आहे.

सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचार आणि धोरण बदलले आहे. त्यामुळे १० वा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीत आली आहे. अजितदादांच्या जाण्याने महाविकास आघाडीची वज्रमूढ आता ढिली झाली आहे,’ असा हल्लाबोल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तसेच सध्याचे बहुमत पाहता अजित पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांची माहिती देण्यासाठी अयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कारण, गेल्यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करताना धावपळ करावी लागली. यावर्षी वेळेपूर्वी १०० टक्के निधी खर्च कसा होईल यावर निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जुलै महिन्याअखेरपर्यंत जास्तीतजास्त कामाची वर्क आॅर्डर काढण्यात येणार आहे. त्यामुळे १०० टक्के निधी वेळेत खर्च होईल. तसेच जलजीवन मिशनमधून घराेघरी स्वच्छ पाणी देण्यात येणार आहे. या मिशनच्या कामांनीही वेग घेतला असून निधीही आणला आहे.  

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी अजित पवार हे महायुतीत आल्याने शिंदे गट नाराज झालेला नाही. आम्ही ५० जण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर मान दिलेली आहे. पूर्वी युतीत ९ पक्ष होते. आता राष्ट्रवादी काॅंग्रेस हा दहावा पक्ष म्हणून सामील झालाय, असे सांगितले. तसेच शिंदे गट राष्ट्रवादी काॅंग्रेसवर नेहमी टीका करायचा. आता अजित पवार युतीत आल्याने अडचण निर्माण झाली आहे का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर मंत्री देसाई यांनी अजित पवार हे चालणारे नाणे आहे. त्यांनी विचार आणि धोरण बदललंय. अजित पवारांच्या येण्याने आमची ताकद वाढली आहे, असे स्पष्ट केले. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील १७ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर मंत्री देसाई यांनी राऊत यांनी नावे सांगावीत असे आव्हान दिले. तसेच ते बोलतात आणि तोंडघशी पडतात असा टोलाही लगावला.  दर्जेदार रस्त्यांसाठी स्वतंत्र गुणनियंत्रण समिती...जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याचा आढावाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावर पत्रकार परिषदेत त्यांनी बांधकाम विभागाला रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची सूचना केल्याचे सांगितले. तसेच ही कामे दर्जेदार होण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र गुणनियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :satara-acसाताराShambhuraj Desaiशंभूराज देसाईAjit Pawarअजित पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी