शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
2
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
3
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
4
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
6
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
7
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
8
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!
9
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
10
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
11
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
12
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
13
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
14
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
15
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
17
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
18
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
19
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे

सातारा : राज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाम, मायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या, कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:59 IST

मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देराज्यमार्गावरील अतिक्रमणामुळे बाजारपेठेवर परिणाममायणीत वाहतुकीच्या कोंडीची समस्या कातरखटावकरांचा आदर्श घेण्याची गरज

मायणी : मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीवर व बाजारपेठेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे मायणीकर कातरखटावकरांचा अतिक्रमण काढण्याचा आदर्श घेणार का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.शैक्षणिक, पर्यटन, धार्मिक व खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असलेल्या या गावात परिसरातील चितळी, कलेढोण, पाचवड, पडळ, धोंडेवाडी, निमसोड व सांगली जिल्ह्यातील माहुली व भिकवडी गावातील व परिसरातील वाड्या वस्त्यातील हजारो ग्रामस्थ रोज व्यापारासाठी व शासकीय कामासाठी येत असतात.

प्राथमिक, माध्यमिक, इंग्लिश मीडियम स्कूल व व्यावसायिक शिक्षणासाठी याच भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. संपूर्ण गावामध्ये दिवसभर वर्दळ असते. मुख्य बाजारपेठेतून व गावातून जाणारा मल्हारपेठ-पंढरपूर हा एकमेव मार्ग असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांची तसेच ग्रामस्थांची वाहने व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहनेही याच मार्गावर लावलेली असतात.चारचाकी व दोनचाकी वाहनांसाठी कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे काही वाहनचालक राज्यमार्गाच्याकडेला किंवा बसस्थानक परिसरात वाहने पार्किंग करून खरेदीसाठी व बँक, शासकीय कामांसाठी जात असतात.

बेशिस्त पार्किंग करून गेलेल्या वाहनचालकांमुळे राज्यमार्गावर सतत वाहतुकीची कोंडी तासन्तास होत असते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसेस बसस्थानकावर न येता चांदणी चौकातूनच विटा, सांगली, वडूज, दहिवडी, बारामतीकडे जातात. विटा आगाराने आठवडा बाजारदिवशी एसटी बसस्थानकावर येणार नाही, असे पत्रच संबंधितांना दिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी