शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बारशाच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा : ग्रामीण भागातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:57 IST

बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले.

ठळक मुद्देनव्या पिढीला स्वातंत्र्याची महती समजावी म्हणून पाळण्याच्या रुपाने आठवणी जागवतायत; महिलांचे कौतुक

दशरथ ननावरे।खंडाळा : बारसे म्हटलं की पाळणा म्हणणे आलंच. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक युगपुरुषांनी, महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या शौर्य कथांच्या आठवणींना ग्रामीण भागात आजही लहान मुलांच्या बारशाच्या कार्यक्रमातून उजाळा दिला जातोय.

मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांना विशेष महत्त्व आहे. या प्रत्येक संस्कारावेळी आपल्या वेगळ्या संस्कृती अनुभवायला मिळतात. असाच एक महत्त्वपूर्ण संस्कार म्हणजे बाळाचे बारसे.१९४२ चा स्वातंत्र्य लढा, महात्मा गांधीजींचा सत्याग्रह, तुरुंगवास, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेनेची स्थापना करून दिलेला लढा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी भूमिगत होऊन प्रतिसरकार स्थापन केले.

मात्र त्यांच्या कार्यशैलीने ते प्रतिसरकार नावाने प्रसिद्ध झाले. यांसह जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अरुणा देवी आदी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रज सरकार विरोधात उठाव करून आगगाडी बंद करणे, कोर्ट कचेरी, पोस्ट आॅफिस बंद पाडणे, गोऱ्या साहेबाला अडवणे यासारख्या घटनांचा उजाळा देत गोरगरिबांवर अन्याय कसा हटवला जात होता. स्वातंत्र्यसाठी क्रांतिकारकांचे योगदान व प्राणार्पण यांचे हुबेहूब वर्णन बारशाच्या कार्यक्रमातून पाळणा म्हणताना आजही केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.हे ऐकूण अंगावर शहारा उभा राहतो. वृद्ध महिलांनी या स्मृती जागृत ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील अशा कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शनही घडते. 

आमच्या लहानपणापासून भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक महात्म्यांनी, क्रांतिकारकांनी योगदान दिले त्यांच्या कार्यस्मृतींना उजाळा पाळण्याच्या रुपाने ऐकत आलो आहोत. ही रुढी परंपरा पुढील काळातही सुरू राहिली पाहिजे. याद्वारे नव्या पिढीला किमान स्वातंत्र्याची महती समजेल.- ताराबाई शिंदे, म्हावशी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास