सातारा/फलटण : ‘छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलाल तर जीभ हासडून हातात देईन. रामराजेंचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काहीही बोलत आहेत. पालकमंत्री शिवतारेंना ते अस्वल म्हणण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. अस्वल गुदगुल्या करून जसे सगळे बाहेर काढते, तसे यांचे उद्योग आता बाहेर निघणार आहेत, असा इशारा रामराजेंना देत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘कोरेगावच्या गुरू कमोडिटीज कारखान्यात घुसून कारखाना जरंडेश्वरच्या ताब्यात देण्याबरोबरच गुरूचा गुरू कोण? हे दाखवून देणार आहे,’ असेही सांगितले. सातारा व फलटण येथे पत्रकारांशी ते बोलत होते. फलटण येथे त्यांच्यासोबत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, महेंद्र बेडके, अॅड. नरसिंह निकम, धनंजय महामुलकर उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ‘मी सातारा जिल्ह्याचा खासदार व छत्रपतींचा वंशज असल्याने मी कोठेही जाऊ शकतो, बोलू शकतो. फलटण तालुक्यावरील रामराजे व त्यांच्या भावांच्या दहशतीला जनता कंटाळली आहे. पाणीप्रश्नावर पंधरा वर्षे झुलवत ठेवणाऱ्यांनी दोन पिढ्यांचे नुकसान केले आहे. श्रीराम कारखाना त्यांच्यामुळेच अडचणीत आला आहे. राजे पॅनेलच्या हाती सभासदांनी सत्ता देऊ नये. रामराजेंना स्वत:च्या नावात ‘राम’ आहे, असे वाटत असेल, तर त्यांनी श्रीराम कारखाना लोकांच्या ताब्यात सुपूर्द करून बाजूला व्हावे.’
छत्रपतींबद्दल बोलाल तर जीभ हासडू
By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST