शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेचा अभिप्राय नोंदविल्यास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज, महाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:11 IST

 स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत  स्वच्छता अ‍ॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे. याअंतर्गत संबंधित तक्रारदाराला प्रथम अ‍ॅपद्वारे स्वच्छतेविषयक तक्रार करावी लागणार आहे. पालिकेकडून या तक्रारीचे तातडीने निरसन केले जाईल.

ठळक मुद्देमहाबळेश्वर नगरपालिकेचा अनोखा उपक्रमस्वच्छता अभियानास व्यापक रूप देण्यासाठी स्वच्छता अ‍ॅप विकसित... अन्यथा पालिका दंडात्मक कारवाई करेल

महाबळेश्वर :  स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या अंर्तगत  स्वच्छता अ‍ॅप वर प्राप्त झालेल्या तक्रारीचे पालिकेकडून निरसन केल्यानंतर अभिप्राय नोंदविणाऱ्या संबंधित तक्रारदारास पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे.याबाबत माहिती देताना नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वच्छता अ‍ॅप विकसित केले आहे. स्वच्छतेविषयी तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांना प्रथम हे अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेविषयक तक्रारी नागरिकांना मोबाईल अ‍ॅपद्वारे करता येणार आहे.

या स्वच्छता मोहिमेला व्यापक रूप देण्याबरोबरच स्वच्छता अभियानात महाबळेश्वरला अव्वल करण्यासाठी पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत संबंधित तक्रारदाराला प्रथम अ‍ॅपद्वारे स्वच्छतेविषयक तक्रार करावी लागणार आहे. पालिकेकडून या तक्रारीचे तातडीने निरसन केले जाईल.

यानंतर संबंधित तक्रारदाराने पालिकेच्या कार्यतत्परतेबाबत स्वच्छता अ‍ॅपद्वारे आपला अभिप्राय नोंदविल्यास त्याला पंचवीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज दिला जाणार आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये शहरात स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे.... अन्यथा दंडात्मक कारवाईमहाबळेश्वर शहरातील कचरा घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. मात्र, अनेक नागरिक अथवा गृहिणी घरातील कचरा घंटागाडीत टाकत नसल्याने पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बाब स्वच्छतेच्या दृष्टीने हितकारक नाही. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा. जे असे करणार नाहीत त्याच्यावर पालिका दंडात्मक कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे

 

टॅग्स :tourismपर्यटनSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान