शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:52 IST

सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या ...

ठळक मुद्देमहिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी१६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार

सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे. त्याचबरोबर महिन्यात सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी उभारणार आहे, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, चिन्मय कुलकर्णी, तानाजी काटकर, विक्रम काटकर, एम. जे. काटकर, चांगदेव काटकर, माणिक काटकर, ब्रम्हदेव पुकळे, दीपक खताळ, राम देशमुख, संजीव साळुंखे, अनिल भोसले, आप्पासाहेब लिगाडे, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.गारळे म्हणाले, खटाव तालुक्याच्या कलेढोण भागातील १६ गावांसाठी कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जिल्ह्याच्या सीमेवरुन टेंभू येजेनेचे पाणी जात आहे. त्यामुळे या गावांना हे पाणी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यातच शासनही काही करत नसल्याने या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. या भागात आटपाडी पॅटर्नप्रमाणे पाणी मिळण्याची गरज असून ते सोयीचे ठरणारे आहे.कुलकर्णी म्हणाले,  पाण्यासाठी या भागातील लोकांनी लढा सुरू केलाय. याला कारण म्हणजे धरणे सातारा जिल्ह्यात आणि पाणी जाते पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यात. हे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पण, अगोदर सातारा जिल्ह्यातील शेतीला आणि लोकांना पाणी मिळायला हवे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी साताऱ्यात या गावांच्या पाण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच याबाबत एक महिन्याच्या आत सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात जनवारांची छावणी उभारणार आहे.अस्तित्वाच्या लढाईसाठी धरण फोडण्याचाही इशारा...या पत्रकार परिषदेत माण आणि खटाव तालुक्यातील या संतप्त ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अस्तित्वाच्या लढाईसाठी आता आम्ही निर्णय घेऊन पाणी येत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार घालणार आहे. रस्त्यावर उतरु, जेलभरो आंदोलन करु. प्रसंगी धरणेही फोडू पण, आमच्या हक्काचे पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. तरच आमची होरपळ थांबणार आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर