शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

शरद पवार पंतप्रधान झाले तर उत्तमच-बाळा नांदगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:27 IST

कऱ्हाड : ‘भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे. तशी मनसेचीही आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल, असेही मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.बाळा नांदगावकर पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना बुधवारी कऱ्हाड  येथे शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधताना ...

ठळक मुद्देकऱ्हाड येथील पत्रकार परिषदेत मत व्यक्त; संदीप मोझर आमचेच

कऱ्हाड : ‘भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे. तशी मनसेचीही आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल, असेही मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.

बाळा नांदगावकर पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना बुधवारी कऱ्हाड  येथे शासकीय विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, शहराध्यक्ष सागर बर्गे, दादा शिंगण, मनोज माळी, विनायक भोसले, आशिष रैनाक आदींची उपस्थिती होती.नांदगावकर म्हणाले, ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यास घेतलेल्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यात संदीप मोझर यांना मीच पक्षात आणले आहे आणि त्यांनी माझ्यावर टीका केली. त्याचे काहीच वाटत नसून कारण ते आमचेच आहेत. पक्षात अंतर्गत वाद हे होतच असतात. त्याकडे लक्ष द्यायचे नसते. पक्षसंघटना बळकटी करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. पश्चिम महाराष्ट्रात दौरे करीत असताना या ठिकाणी मनसे पक्षात येणाºयांची संख्या जास्त असल्याची दिसते. कºहाड व पाटण तालुक्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे नांदगावकर म्हणाले. दरम्यान, नांदगावकर यांनी बुधवारी सकाळी कृष्णाघाट येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.जिल्ह्यात मनसे बळकट करणार‘मनसे’च्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर महाराष्ट्राचे दौरे सुरू झाले आहेत. सातारा जिल्ह्णात मनसेच्या पदाधिकाºयांचे कार्य चांगले आहे. संदीप मोझर यांचे पक्षाच्या माध्यमातून चांगले काम असून, ते नाराज असण्याचे काही कारण नाही. कारण ते आमचेच आहेत. सातारा जिल्ह्णात मनसेची स्थिती बिकट असल्याने जिल्ह्णात मनसे बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.मुलाखती घेण्यामागेराजकारणाचा संबंध नाहीमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. यानंतर मुलाखत घेण्यामागे काही राजकारण असल्याच्या चर्चा केल्या जाऊ लागल्या. मात्र, मुलाखतीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले.

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरSatara areaसातारा परिसर