देशी गायीला राजमातेचा दर्जा द्या, जर कोणी विकायला निघाला, तर त्याला फाशी द्या. मात्र, जर्सी गाय, जर्सी होस्टन, म्हैस, बैल, जर्सी गायीचे खोंड, यांना अडवू नका, हे त्याच्या जगण्याचं साधन आहे, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीने फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा बनावट अथवा बोगस गोरक्षकांविरोधात होता. यानंतर ते बोलत होते.
खोत म्हणाले, "आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा शेतकरी चालायला तयार आहे, हे सांगण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने येथे आलो आहोत. मुळात शेती हा एक व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसाय हा त्याचा प्रमुख भाग झाला आहे. शेतकऱ्याच्या घरात दहा दिवसाला दूध सोडून इतर कुठलेही येत नाहीत. परंतु काही लोक या व्यवसायात अडथळे निर्माण करीत आहेत. ग्रामीण भागात देशी गाय शेतकरी कधीही विकत नाही; देशी कायीला शेतकरी गोमाता मानतो. तो ती पाहुण्यांना, मित्रांना मोफत देतो. पण दुधाळ संकरीत गाय, जर्सी, होस्टन, म्हैसाना म्हशी या मात्र तो विकतो." खोत एबीपी माझासोबत बोलत होते.
खोत पुढे म्हणाले, एका गायीपासून तीन गाई झाल्या, दोन गायींपासून पाच गायी झाल्या, तर त्यांपैकी काही, तो मुलांच्या शिक्षणासाठी, लेकीच्या लग्नासाठी, आजारपणावेली तो देत असतो. पण गोवंश हत्या कायद्याच्या आजोशाने अनेक जण गायींचे रक्षण करण्यासाठी पुढे यायला लागले आहेत आणि विकायला जाणाऱ्या जरसी यागींना अडवायला लागलेत. जप्त करून परत गोशाळेत न्यायला लागले आहेत. शेतकरी न्यायालयात फिरतो, गोशाळांना दोन-दोन लाख रुपये द्यावे लागतात आणि तरीही जनावरे मिळत नाहीत. यामुळे राज्यातील दुग्ध व्यवसाय मोडकळीस येईल आणि दुग्ध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होतील आणि त्यांच्या आत्महत्या सुरू होतील. म्हणून सरकारने या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल आणि दही, दुधाचा कोटा वाचवावा लागेल. हे सांगण्यासाठी येथे आलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे."
याशिवाय, "भाकड गायींना आधी ५०००० मिळत होती. आता १०००० मिळेनात, नुसती एक गाय सांभाळायची म्हटलं तर महिन्याला ९००० रुपये खर्च येतो, वर्षाला १,१०,००० रुपये. शेतकरी हे पैसे कुठून आणणार? तुम्ही का त्याच्या अर्थचक्रात अडथळा निर्माण करत आहात? असा माझा प्रश्न आहे. असेही खोत यावेळी म्हणाले.