शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: संन्यास घेणार नाही; माझ्याकडे अनेक तिकिटे, उदयनराजे भोसलेंचे सूचक वक्तव्य

By सचिन काकडे | Updated: March 16, 2024 16:21 IST

वेळ आल्यानंतर बघू

सातारा : 'महायुतीत तीन पक्षाचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी असे वाटते आणि ते चुकीचे नाही. आपल्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. सध्या इतकंच सांगतो की मी काही संन्यास घेणार नाही. माझ्याजवळ बसचे तिकीट आहे ट्रेनचे आहे आणि विमानाचेही तिकीट आहे,' असे सूचक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.सातारा पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाचे लोकार्पण शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, विनीत पाटील आदी उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांनी या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघ चर्चेचा ठरला आहे. या मतदारसंघात आपल्याला तिकीट मिळणार का? याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले, 'माझ्याजवळ बसचे तिकीट आहे. ट्रेनचे तिकीट आहे. विमानाचे तिकीट आहे. सर्व तिकीट आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.

वेळ आल्यानंतर बघू उमेदवारीची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि माझ्या नाराजीचे बोलाल तर मी काही संन्यास घेतलेला नाही. भाजपकडून आपल्याला संधी मिळणार का? या प्रश्नाला बगल देत 'वेळ आल्यानंतर बघू' असे ते म्हणाले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत उदयनराजे यांनी प्रथमच सूचक वक्तव्य केल्याने राजकीय धुरीणांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेlok sabhaलोकसभाBJPभाजपा