शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मला दोन मंत्र्यांमध्ये भीतीच वाटत होती, शंभूराज देसाईंची मिश्किल फटकेबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 18:18 IST

साताऱ्यातील नेते एकाच मंचावर 

सातारा : जिल्हा परिषदेच्या सत्तेचा पेच अद्याप कायम असताना, गुरुवारी (दि.१९) शिवजयंतीच्या निमित्ताने साताऱ्यात एक आगळेवेगळे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. एकाच मंचावर महायुतीचे तीन दिग्गज मंत्री एकत्र आले, पण त्यांच्यातील राजकीय अंतर मात्र लपून राहिले नाही. भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्याबरोबर मध्यभागी बसलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, ‘दोन मंत्र्यांनी मला मध्ये घेतले होते, तिथून उठेपर्यंत मला त्यांची भीतीच वाटत होती,’ अशी मिश्किल फटकेबाजी करतानाच जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणला.साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटणमधील डोंगरी महोत्सवाची माहिती दिल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेबाबत बोलते केले. येत्या २३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी सत्तेचा हा तिढा सुटणार का? यावर देसाई म्हणाले, जशी तुम्हा माध्यमांना उत्सुकता आहे, तशीच मलाही प्रचंड उत्सुकता आहे. एकदाचा या प्रश्नावर कायमचा पडदा पडला पाहिजे. महायुतीतील तिन्ही पक्षांना एकत्र यायचे होते, मात्र तसे घडले नाही. निवडणुकीपूर्वी मंत्री मकरंद पाटील आणि आम्ही एकमेकांसाठी जागा सोडल्या, चर्चा केली आणि निवडणूक लढवली. नगरपालिकेतही आम्ही एकीसाठी पाऊल पुढे टाकले होते, पण भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीलाही भाजपने गांभीर्याने घेतले नाही, परिणामी राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेने एकत्र येत मोठे यश मिळविले.भावना उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्याजिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेला १५, तर पंचायत समितीत ४६ जागांवर यश मिळाले आहे. या निवडून आलेल्या सर्व सदस्यांची मते आम्ही प्रत्यक्ष जाणून घेतली आहेत. त्यांच्या मनात असलेल्या भावना आणि राजकीय वस्तुस्थिती आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविली आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Minister Desai's witty remarks on unease between fellow ministers.

Web Summary : Minister Shambhuraj Desai's humorous comments about feeling intimidated between two ministers sparked political buzz. He highlighted coalition tensions during a Shiv Jayanti event and discussed ongoing challenges in forming the Zilla Parishad government, noting disagreements among alliance partners.