मला जगायचे नाही.. जीव देऊन कामाला लावतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST2021-01-13T05:39:38+5:302021-01-13T05:39:38+5:30

सातारा : एका गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीने मला जगायचे नाही.. तुम्हाला कामाला लावतो, अशी पोलिसांना धमकी देत ...

I don't want to live .. I work with my life! | मला जगायचे नाही.. जीव देऊन कामाला लावतो !

मला जगायचे नाही.. जीव देऊन कामाला लावतो !

सातारा : एका गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी आणलेल्या संशयित आरोपीने मला जगायचे नाही.. तुम्हाला कामाला लावतो, अशी पोलिसांना धमकी देत स्वतःचे डोके भिंतीवर आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधितावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवार, दि. ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयित आरोपी असलेल्या अक्षय लालासोा पवार (वय २५, रा. खंडोबाचा माळ, सातारा) यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन चौकशीसाठी सातारा येथील कार्यालयात आणले होते. यावेळी त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने ‘‘मला आता जगायचे नाही, मी जीव देऊन तुम्हाला कामाला लावतो’’, असे म्हणून सातारा एलसीबीच्या कार्यालयातील भिंतीवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अक्षय पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सणस हे करत आहेत.

Web Title: I don't want to live .. I work with my life!