शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

Satara: लाडकी बहीण फसवणूकप्रकरणी पती-पत्नीस पोलिस कोठडी, आधार कार्ड सर्च करून दाखल केले होते ३० अर्ज

By दीपक शिंदे | Updated: September 4, 2024 19:05 IST

योजनेपेक्षा अधिक पैसे मिळविण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर

वडूज : लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन, योजनेला गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्याच सातारा जिल्ह्यातील निमसोड येथील दांम्पत्याने केले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, या प्रकाराची आता चौकशी सुरू आहे. प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता ६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.विविध आधार कार्डांचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे प्रतीक्षा जाधव हिने पती गणेश घाडगे याच्या मदतीने एकूण ३० अर्ज भरले. त्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या तिच्या खात्यावर वडूज येथील माणदेशी महिला सहकारी बँकेत पैसेही जमा झाले. अधिक पैसे मिळविण्याच्या उद्देशाने तिने ही फसवणूक केल्याने प्रतीक्षा आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

गुगलवर आधार कार्ड सर्च करून या दाम्पत्याने हे ३० अर्ज दाखल केले होते. प्रतीक्षा जाधव हिने जेमतेम बारावी शिक्षण झालेला पती गणेश संजय घाडगे याच्या मदतीने शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षाराणी ओंबासे यांनी या दाम्पत्याविरोधात वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून ३३८, ३३६ (३), ३४० (१), ३४० (२), ३१८(४), ३१९ (२), ३१४ व ३ (५) या कलमान्वये प्रतीक्षा पोपट जाधव व तिचा पती गणेश घाडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

एकूण ३० अर्ज भरले, चार मंजूरप्रतीक्षा जाधव हिने भरलेल्या ३० अर्जांपैकी प्रतीक्षा पोपट जाधव, मंगल संजय घाडगे, सुनंदा संजय पिसाळ आणि कोमल संजय पिसाळ यांचे अर्ज शासनमान्य झाले आहेत. तर प्रतीक्षा पोपट जाधव या नावाने भरलेले २५ अर्ज तपासणीअंती बनावट निघाले असून अजून प्रतीक्षेचा एक अर्ज मान्यतेच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस